Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

होणाऱ्या बायकोला लेहंगा आवडला नाही, तरुण थेट दुकानात गेला अन् चाकू काढत....; कल्याणमधील विचित्र प्रकार

  Mumbai Viral Video: मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत तरुण एका कपड्याच्या शोरुममध्ये लेंहगा फाडताना दिसत आहे

होणाऱ्या बायकोला लेहंगा आवडला नाही, तरुण थेट दुकानात गेला अन् चाकू काढत....; कल्याणमधील विचित्र प्रकार

Mumbai News Today: कल्याणमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एक व्यक्तीने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी एक लेहंगा खरेदी केला. मात्र काही दिवसांनी त्याला तो लेहंगा परत करायचा होता. मात्र दुकानदाराने लेहंगा परत घेण्यास नकार दिला. या कारणावरुन तो चिडला होता. तरुणाने खरेदी केलेला लेहंगा 32,300 रुपयांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला लग्नासाठी लेहंगा खरेदी करायचा होता. मात्र नंतर तिला तो परत करायचा होता. मात्र दुकानदाराने पैसे परत देण्यास नकार दिला. तेव्हा तरुण चाकू घेऊन दुकानात गेला आणि रागाच्या भरात त्याने लेहंगा फाडून त्याचे तुकडे-तुकडे केले.

आरोप आहे की, त्या व्यक्तीने शोरुमच्या कर्मचाऱ्यांनादेखील धमकावले होते. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटिव्ही कैमेऱ्यात कैद झाली आहे. शोरुमच्या मॅनेजरने लगेचच पोलिसांना फोन केला मात्र तोपर्यंत तरुण शोरुमधून निघून गेला होता. सीसीटीव्ही फुटेजमधून त्याची ओळख पटवण्यात आली.

मेघना मखिजा नावाच्या तरुणीने 17 जून रोजी हा लेहंगा खरेदी केला होता. त्याच संध्याकाळी तिने दुकानात फोन करुन सांगितले की, मला लेहंगा पसंत आला नाही. मला तो लेहंगा परत करायचाय. तेव्हा दुकानदाराने तिला सांगितले की, पैसे परत मिळणार नाहीत. मात्र ती क्रेडिट नोट घेऊ शकते. क्रेडिट नोट घेऊन ती दोन महिन्याच्या आत दुकानातील दुसरं काही तरी खरेदी करु शकता. एक महिन्यानंतर शनिवारी पुन्हा त्या दुकानात गेली.

एका सेल्समॅनने त्यांना सांगितले की, सध्या त्यांच्याकडे स्टॉक क्लिअरन्स सेल सुरू आहे. त्यांनी तरुणीला पुढच्या महिन्यात यायला सांगितले. त्यानंतर काही वेळाने तिचा होणारा पती सुमित सयानी रागात शोरुममध्ये घुसला. त्याने पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा शोरुमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नकार दिला. तेव्हा त्यांनी चाकू काढला आणि तिथेच लेंहगा फाडायला सुरुवात केली.

दरम्यान, ग्राहकाच्या या वर्तवणुकीमुळं दुसरे ग्राहक घाबरले. त्या तरुणाने 3 लाखांची मागणी करत धमकी दिली की 3 लाथ द्या नाहीतर मी दुकानाच्या सर्व्हिसबाबत गुगलवर वाईट रिव्ह्यू देईन.

पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याला लगेचच जामीनदेखील मिळाला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे

Read More