Kalyan Viral Video: गेल्या काही दिवसांपासून मराठी-हिंदी भाषा वादाचा मुद्दा चर्चेत आहे. असं असतानाच कल्याणमध्ये एक खळबळनजक घटना घडली आहे. कल्याणमधील परप्रांतीय तरुणाने दादागिरी करत मराठी तरुणीला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या तरुणाविरोधात मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित तरुणी ही खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम पाहते. 21 जुलै रोजी रुग्णालयात गोपाल झा नावाचा परप्रांतीय तरुण आला. तेव्हा त्यांने डॉक्टरांची भेट घ्यायची असल्याचे सांगितले. तेव्हा पीडित तरुणीने डॉक्टरांकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा, असं सांगितले. या क्षुल्लक गोष्टीवरुन परप्रांतीय तरुणाने तिला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
पाडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जुले रोजी संध्याकाळच्या सुमारास एक तरुण रुग्णालयात आला. पण डॉक्टरांच्या आदेशानुसार आतमध्ये म्हणजेच डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये MR बसले असताना कोणालाही आतमध्ये पाठवू नये, असा नियम आहे. याच नियमाते पालन करत असताना नशेखोर तरुण कोणालाही न जुमानता सरळ डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसला. तेव्हा त्याला थांबा जाऊ नका, असं म्हटलं.
Kalyan | कल्याणमध्ये परप्रांतीय तरुणाची दादागिरी; मराठी तरुणीला बेदम मारहाण#kalyan #viralvideo #kalyancase #zee24taas pic.twitter.com/z2ZkKySqQk
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 22, 2025
पीडित तरुणीने नशेखोर तरुणाला अडवल्यानंतर त्याने सरळ धावत येऊन तरुणीच्या तोंडावर लाथ मारुन खाली पडलं. व तिचे कपडे फाडून लाखा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंदवली असून नशेखोर तरुण पीडित तरुणीच्या अवतीभवती फिरत असल्याचे तिने म्हटलं आहे.