Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

कमला मिल प्रकरणी २ अधिकारी दोषी

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सोपवला आहे. 

कमला मिल प्रकरणी २ अधिकारी दोषी

मुंबई : कमला मिल आग प्रकरणी मुंबई महापालिकेनं केलेल्या चौकशीत पालिकेचे सहायक आयुक्त प्रकाश सपकाळे आणि भाग्यश्री कापसे यांना सकृतदर्शनी दोषी ठरवण्यात आलं आहे. 

एवढंच नव्हे तर कमला सिटीचे मालक गोवानी आणि वन अबोव्ह तसंच मोजो रेस्टॉरंटचे मालक हे देखीला आगीला तितकेच जबाबदार आहेत, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सोपवला आहे. 

या आगीनंतर 5 पालिका अधिका-यांना निलंबित करण्यात आलंय. आता प्रकाश सपकाळे आणि भाग्यश्री कापसे यांच्यासह दहा पालिका अधिका-यांची चौकशी करण्यात येणार आहे. 

सुशोभिकरणासाठी ज्वलनशील वस्तूंचा केलेला वापर, आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझायनमध्ये केलेले बेकायदा बदल यामुळं आग लागल्याचं अहवालात म्हटलंय.

Read More