Abhishek Ghosalkar News Live Updates : शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी मुंबईतील दहिसर परिसरात वैयक्तिक वादातून गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर अवस्थेत अभिषेक यांना बोरिवली येथील करुणा रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता.
अभिषेक घोसाळकर अनंतात विलिन झाले आहेत. अंत्यदर्शनासाठी शोकाकूल नागरिकांची गर्दी जमल्याचं पहयला मिळालं. अभिषेक घोसळकरांना अखेरचा निरोप देताना कुटुबींयांच्या अश्रूंचा बांध देखील फुटला होता.
"मॉरिसच्या मनात घोसाळकर यांच्या विरुद्ध तीव्र संताप होता. साडेचार महिने मॉरिस हा बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात राहून आला होता. तुरुंगातून जामिनावरती घरी आल्यानंतर मॉरिस हा सारखा मी अभिषेक घोसाळकर याला सोडणार नाही मारून टाकणार असं बोलत असत," असे मॉरिसच्या पत्नीने पोलिसांना सांगितले. दरम्यान काही दिवसांपूर्वी मॉरिस आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
"काल उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या झाली हे खूप गंभीर आहे. एका तरुण नेत्याची हत्या झाली हे दुःखद आहे. पण यावर राजकारणही खेदजनक आहे. या लोकांनी अनेक वर्षे एकत्र काम केले. पण काही कारणांमुळे हे घडले. याचीही चौकशी केली जाईल. बंदुकीचे परवाने तपासण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत," असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"लोकांच्या डोक्याला काय झालय मला कळत नाही. फेसबुक लाईव्ह करतात आणि अशा घटना घडतात. चोऱ्या, दंगल अशा घटनांमध्ये पोलीस संरक्षण देत असतात. इथं तुमच्या घरात येऊन घटना घडत आहेत. पोलिसांनी बंदूक लायन्स देताना अधिक काळजी घेतली पाहिजे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बंदूक देऊ नये. मॉरिस हा तुरुंगामध्ये होता. मग त्याच्याकडे बंदूक कशी आली. गृहमंत्री यात काय करू शकतो. राजीनाम्याची मागणी चुकीची आहे. दहशतवाद, दंगे, चोऱ्या अशा ठिकाणी गृहमंत्री काळजी घेऊ शकतो," असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं.
ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव मुंबईतील बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.
#WATCH | Mortal remains of Shiv Sena (UBT) leader Abhishek Ghosalkar brought to his residence in Mumbai's Borivali.
He was shot in a firing in the Dahisar area of Mumbai, yesterday. pic.twitter.com/RzQi0iYGAV
— ANI (@ANI) February 9, 2024
मॉरिस नोरोन्हा 10 दिवसांपूर्वीची फेसबुक पोस्ट समोर आली आहे. 29 जानेवारी रोजी त्याने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्याच्यासोबत त्याने एक कॅप्शन लिहीले होते. "तुम्ही अशा माणसाला हरवू शकत नाही ज्याला वेदना, नुकसान, अनादर आणि नकार याची पर्वा नाही," असे मॉरिस नोरोन्हा याने म्हटलं आहे.
"अशाप्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडताच कामा नये या मताचा मी आहे. व्हिडीओमध्ये संवाद ऐकून दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत असे वाटते. याचा नीट तपास झाला पाहिजे. झालेली घटना चुकीची आहे. पण पोलीस यंत्रणा बाहेर असली तरी दोघे आत बसले आहेत आणि चर्चा करत आहेत. त्यातील एकजण हाफ चड्डीवरच दिसतोय. दोघांचे संभाषण दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर त्याने हे कृत्य केले आहे. विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना निमित्त मिळालेलं आहे. पण नक्की काय झालं हे पाहण्यासाठी पाठीमागची पाश्वभूमी तपासली पाहिजे. याप्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर चर्चा केली. दोघे एकमेकांची चेष्टामस्करी करत होते असे व्हिडीओमध्ये दिसत होते," असे अजित पवार यांनी म्हटलं.
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी मयत मॉरिसचा स्वीय सहाय्यक मेहुल पारीख याला रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मेहुल पारीख घटनास्थळी उपस्थित होता आणि फेसबुक लाईव्हच्या वेळी कॅमेराच्या मागे उपस्थित होता. मेहुल हा मॉरिसच्या अगदी जवळचा असल्याचं म्हटलं जातं, त्यामुळे या हत्येचा कट रचण्यात त्याचीही काही भूमिका होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
"एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतकं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे. अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तरप्रदेश मधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे. राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. राज्यात काय सुरू आहे याची जाणीव तरी सत्ताधाऱ्यांना आहे का?" असा सवाल विरोधी पक्षनेते विडय वडेट्टीवार यांनी केला आहे.
"महाराष्ट्राने ह्यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये! हे भीषण आहे!," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून मोरिस नोरोन्हा हा अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत जवळीक साधत होता. मोरिसने साडी वाटप करू म्हणून घोसाळकर यांना कार्यलयामध्ये बोलवून घेतले होते. तसेच मॉरिस याच्या सोबत असणारा मेहुल हा अभिषेक घोसाळकरांची रेकी करत होता, अशी माहिती अभिषेक घोसाळकर यांच्या सोबत असणारे चेतन परमार यांनी दिली.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.