Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement
LIVE NOW

Ganpat Gaikwad Shooting LIVE: महेश गायकवाडवर सहा तास शस्त्रक्रिया; प्रकृती गंभीर असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

Ganpat Gaikwad Shooting LIVE: महेश गायकवाडवर सहा तास शस्त्रक्रिया; प्रकृती गंभीर असल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती
LIVE Blog

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणेश गायकवाड यांनी गोळ्या झाडल्या. हा गोळीबार हिल लाईन पोलीस ठाण्यामधील एका वरिष्ठ पोलिसाच्या केबिनमध्ये घडला. आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते. त्यानंतर गणपत गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

03 February 2024
03 February 2024 18:26 PM

गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी

03 February 2024 15:24 PM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आलं - श्रीकांत शिंदे

"महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर जो हल्ला झाला त्यानंतर दोघांना ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महेश गायकवाडवर सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या. पहाटे महेश गायकवाड यांना अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. डॉक्टरांचे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी दोघांची चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत," असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

03 February 2024 15:08 PM

'राज्य सरकार या बाबतीत...'; Ganpat Gaikwad प्रकरणावरुन पवारांनी बोलून दाखवली चिंता

उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबारानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवारांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

03 February 2024 15:05 PM

'कोण कुठल्या पक्षाचा...'; Ganpat Gaikwad Shooting प्रकरणात फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. गणपत पाटील यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली असून या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहेत. जखमी अवस्थेतील महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून या प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया नोंदवली आहे. (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

03 February 2024 14:58 PM

BJP चे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Kalyan Crime CCTV: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचेच दोन नेते आपापसात भिडल्याने राजकारणही तापलं  आहे. गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान या गोळीबाराचं सीसीटीव्ही आता समोर आलं आहे. या सीसीटीव्हीत पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं हे दिसत आहे. सीसीटीव्हीत दिसत आहेत त्यानुसार कोणालाही गोळीबार होईल याची कल्पनाही नव्हती. पण गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात नेमकं काय चित्र होतं हे तुम्ही त्यात पाहू शकता. 

 

बातमीची लिंक 

03 February 2024 14:08 PM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : महाराष्ट्राच्यादृष्टीने अशा घटना चिंताजनक घटना - शरद पवार

सत्तेचा गैरवापर केला जातो, अशी तक्रार नेहमी होत असते. गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे कळते. महाराष्ट्राच्यादृष्टीने अशा घटना चिंताजनक आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.

03 February 2024 10:22 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला - संजय राऊत

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका आमदाराने गोळीबार करुन सुद्धा मुख्यमंत्र्यांचे निवेदन नाही. गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही. अजित पवार म्हणतात गृहमंत्र्यांशी चर्चा करेन. हे फक्त चर्चा करण्याइतके सौम्य आहे का?, असा सवाल राऊतांनी केलाय. अधिक वाचा...

03 February 2024 09:59 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : गोळीबार प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

03 February 2024 09:08 AM

"शिंदे CM असतील तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील"; गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचा हल्लाबोल

भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच अंदाधुंद गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या सामान्य माणसाला आरोपी बनवत आहेत, असं आमदार गायकवाड यांनी 'झी 24 तास'कडे नोंदवलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. गणपत गायकवाड यांना सकाळी साडेसातच्या सुमारस पोलिसांनी अटक केली आहे. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

03 February 2024 09:06 AM

'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी

कल्याण पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. अगदी आपले कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेंकडे असल्याच्या दाव्यापासून ते शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी गणपत गायकवाड यांनी केली आहे. उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर 'झी 24 तास'शी बोलताना हा धक्कादायक आरोप केला आहे. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

03 February 2024 09:04 AM

..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान

उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना त्याच पक्षाचा आमदार कायदा हातात घेतो, यासंदर्भात 'झी 24 तास'शी बोलताना आमदार गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावरही प्रतिक्रिया नोंदवली आहे. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

03 February 2024 08:48 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? अजित पवारांचा सवाल

"आमदाराचं झी 24 तासशी झालेलं बोलणं ते मी पाहिलं. मुळात कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ असून तो सर्वांसाठी समान आहे. सामन्य व्यक्ती असेल किंवा उच्च पदावरील व्यक्ती असेल सर्वांना नियम आणि कायदे सारखेच आहेत. इतक्या टोकाचा निर्णय का त्यांनी घेतला? चॅनेलला फोनवरून दिलेली माहिती देखील कायद्याला धरून नव्हती," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

03 February 2024 08:38 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?; विजय वडेट्टीवारांची टीका

"भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस "सागर" बंगल्यावर आणि शिंदे गटाचे "बॉस" वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र  कधी नव्हता!," अशी पोस्ट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

03 February 2024 08:36 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : मुख्यमंत्र्यांनी किती पैसे खाल्ले ते सांगावे - गणपत गायकवाड

"एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे. मी वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितलं होतं की हे लोक वारंवार माझा अपमान करतात. माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे स्वत:चे बोर्ड लावतात जबरदस्तीने. मी वेळोवेळी सांगितलं आहे. मी ज्या ज्या ठिकाणी राज्य शासनाचा निधी आणला त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी आपले बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदेंनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावे," असेही गणत गायकवाड म्हणाले.

03 February 2024 08:35 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : एकनाथ शिंदे असतील तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील - गणपत गायकवाड

"एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलं आहे," असा गंभीर आरोप गणपत गायकवाड यांनी केला.

03 February 2024 08:34 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना अटक

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्व चे आमदार गणपत गायकवाड यांच्या सह दोन जणांविरोधात जीवे मारण्याचा ,तसेच शस्त्र कायदा अंतर्गत रात्री उशिरा हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे , पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे , संदीप सरवणकर या दोन जणांना अटक केली आहे. रात्री उशिरा यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली , सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी गणपत गायकवाड यांना शासकीय रुग्णालयात न नेता पोलीस ठाण्यातच त्यांची वैद्यकीय तपासणी केली. आमदार काय गायकवाड यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
कोणीही चिथावणी न देता गणपत गायकवाड यांनी शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्या असल्याचा पोलिसांनी सांगितलं. द्वारली गावात असलेल्या जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

03 February 2024 08:31 AM

BJP MLA Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad : ...म्हणून मी गोळीबार केला - गणपत गायकवाड

"पोलीस  ठाण्यामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली," अशी प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली.

Read More