Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement
LIVE NOW

BMC Budget 2023 LIVE Updates : मुंबई पालिकेचे 52619 कोटींचे बजेट, 'यासाठी' विशेष तरतूद

 Budget 2023 Updates :  मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. (Mumbai Municipal Corporation Budget 2023) आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. ( BMC Budget In Marathi ) यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं ( Mumbai News) आकारमान 50  हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. (BMC Budget 2023 )  

BMC Budget 2023 LIVE Updates : मुंबई पालिकेचे 52619 कोटींचे बजेट, 'यासाठी' विशेष तरतूद
LIVE Blog

Mumbai Budget 2023 Updates : सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. (Mumbai Municipal Corporation Budget 2023) आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. ( BMC Budget In Marathi ) यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं ( Mumbai News) आकारमान 50  हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. (BMC Budget 2023 ) मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे बजेट होते.

04 February 2023
04 February 2023 11:53 AM

BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. ते म्हणाले,  52619.07 कोटी रुपयांचे हे बजेट आहे. प्रथमच 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 14.50 टक्के अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षाशी तुलना केली आता  52 ट्क्के कॅपिटल म्हणजे विकासवर खर्च होणार 48 टक्के इतर गोष्टींवर खर्च होणार आहे. विकास कामांवर प्रथमच 50 टक्के अधिक खर्च केला जाईल.

04 February 2023 11:34 AM

BMC बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही !

BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.

04 February 2023 11:32 AM

BMC Budget 2023 Updates : पाणी पुरवठा प्रकल्प विभागासाठी 1376 कोटी. गेल्यावर्षी 887.88 कोटी 
- आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया केंद्र. यात कुलाबा येथे मलनिस्सारण केंद्रातील मलजलाचे पाणी पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरित करणार प्रतिदिन 12 दशलक्ष लिटर पाणी  यासाठी 32 कोटी 
- जलवाहन बोगद्याच्या कामासाठी 119.50 कोटी
- जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणिपुनरस्थापना 136 कोटी

04 February 2023 11:27 AM

शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्पासाठी विशेष तरतूद

BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणाचा अर्थसंकल्पामध्ये (BMC Budget 2023) विशेष तरतूद
- शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प
- बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
- दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
- बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार

04 February 2023 11:23 AM

BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  सात एसटीपी प्रकल्पांसाठी 2792 कोटी रूपयांची तरतूद

04 February 2023 11:22 AM

BMC Budget 2023 Updates :  मुंबई महापालिका सामाजिक प्रभाव उपक्रम.महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी भरीव तरतूद 
- महिला बचतगट - 11.65 कोटी 
- महिला अर्थ सहाय्य योजना - 100 कोटी 
- दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थ सहाय्य 25.32 कोटी 
- तृतीय पंथीयांसाठी पहिल्यांदाच अर्थ सहाय्य 2 कोटी
- ज्येष्ठ नागरिक - 11 कोटी 
- महिलांसाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी

04 February 2023 11:20 AM

BMC Budget 2023 Updates :  राज्य सरकारकडून मालमत्ता करासह विविध येणे थकबाकी 7223 कोटी इतकी आहे. थकबाकी देण्याची पालिकेची राज्य सरकारला विनंती

04 February 2023 11:19 AM

BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 2570 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

04 February 2023 11:15 AM

BMC Budget 2023 Updates : मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटींची तरतूद

04 February 2023 11:14 AM

BMC Budget 2023 Updates : आरोग्य विभागासाठी 1680 कोटी रूपयांची तरतूद. मागील वर्षी  1287 कोटींची तरतूद होती. 

04 February 2023 11:14 AM

BMC Budget 2023 Updates : मुंबईचा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणली आहे. दरवर्षी हिवाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक खराब होतो त्यामुळे हवेच्या गुणवत्ते वर परिणाम होतो

04 February 2023 11:14 AM

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  मुंबईचा वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदा दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे   

04 February 2023 11:12 AM

 BMC Budget 2023 Updates :  भायकळा येथील राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद  ।  गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार 

04 February 2023 11:11 AM

मुंबईत चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार

BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न 

04 February 2023 11:10 AM

गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण

BMC Budget 2023 Updates : मुंबई मलनिसारण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 2792 कोटी रुपये तरतूद तर गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार 

04 February 2023 11:09 AM

BMC Budget 2023 Updates :  मुंबईकरांना पार्किंग अ‍ॅपच्या मदतीने 32 सार्वजनिक पार्किंग लॅाट आणि 91 ॲानस्ट्रीट वाहनतळ सेवा मिळणार आहे

04 February 2023 11:09 AM

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1060 कोटी रूपयांची तरतूद

 

04 February 2023 11:05 AM

 रस्ते आणि पुलांसाठी भरीव तरतूद

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पुलांसाठी 4925 कोटी रुपयांची तरतूद

04 February 2023 11:03 AM

बेस्टला 800 कोटी  तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  बेस्टला 800 कोटी रुपयांची मदत दिली जाणार तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

04 February 2023 10:55 AM

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे होते बजेट

04 February 2023 10:52 AM

मुंबई महापालिकेचे बजेट 52619 कोटी रुपयांचे

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं आकारमान 50 हजार कोटींच्यावर गेले आहे. (BMC Budget 2023)  यावर्षी  शिक्षण विभागाचे बजेट 3347 कोटी रूपयांचे सादर तर मुंबई महापालिकेचे बजेट 52619 कोटी रुपयांचे. बजेटने केली पहिल्यांदाच पन्नाशी पार

04 February 2023 10:29 AM

BMC Budget 2023 Updates :  सुरुवातीला सकाळी 10.30 वाजता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका) डॉ. इक्बाल सिंह चहल यांना सादर करतील. तर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक (महानगरपालिका)  डॉ. इकबाल सिंह चहल यांना सादर करतील.

04 February 2023 09:21 AM

BMC Budget 2023 Updates : मुंबईत जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार, एसी लोकल वाढवणार, मुंबई सेंट्रल-बोरीवली सहावा मार्ग, सीएसएमटी-कुल्रा पाचव्या-सहाव्या मार्गांवर लक्ष केंद्रीत करणार

04 February 2023 08:26 AM

BMC Budget 2023 Updates : BMCचा आज अर्थसंकल्प सादर होतोय, त्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे आयुक्तांना पत्र । सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी द्यावा । BMCचा आर्थिक निधी नवीन प्रकल्पांवर खर्च करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल, असे आदित्य यांनी म्हटले आहे.

04 February 2023 08:16 AM

BMC Budget 2023 Updates : मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं आकारमान 50 हजार कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. (BMC Budget 2023)  यावर्षी पालिकेची आणि नगरसेवकांची मुदत संपलेली असल्यामुळे तसेच निवडणूक अजून झालेली नसल्याने अर्थसंकल्प प्रशासकीय पातळीवरच जाहीर होईल. यावर्षी अतिरिक्त मनपा आयुक्त अश्विनी भिडे या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प प्रशासक इकबालसिंह चहल यांना सादर करतील.

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प, 50000 हजार कोटींचे Budget ?

04 February 2023 08:14 AM

BMC Budget 2023 Updates : तब्बल 38 वर्षांनंतर 7 मार्च 2022 पासून प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई पालिकेचा (BMC Budget 2023) कारभार चालवला जात आहे.

04 February 2023 08:12 AM

BMC Budget 2023 Updates : देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या  (BMC Budget 2023) इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Read More