Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर सध्या मुंबईसह उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला असून, बड्या नेत्यांनीही प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा, तर नाशिक आणि डोंबिवलीत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये त्यांनी विरोधकांवर केलेली टीका पाहता आता या टप्प्यासाठीचं राजकारण पुन्हा तापताना दिसत आहे. यामध्ये कोणकोणत्या नेत्यांची भूमिका लक्ष वेधणारी आणि विरोधी पक्षांना ललकारणारी आहे याच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
मोदीजी येत्या चार तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असणार आहात पंतप्रधान नसणार आहात. चार वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही डी मॉनिटायझेशन केलेलं त्याप्रमाणे चार तारखेनंतर तुम्ही डीमोदीटायजेशन करणार आहात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. मोदी तुम्ही जर शब्दाचे पक्के असाल तर 75 वर्षानंतर तुम्ही राजकारण सोडाल. कारण तुम्ही दोन वर्षानंतर 75 वर्षांचे होणार आहात आणि मग तेव्हा भाजपाचे काय होणार? आता तुमचा फक्त एकच चेहरा आहे तो देखील चालत नाही तुमच्या नंतर भाजपला चेहराच नाही. भाजपच्या कठीण काळात सगळ्या पक्षांनी तुमच्याकडे पाठ फिरवलेली असताना शिवसेना तुमच्याबरोबर होती, अशी आठवण देखील उद्धव ठाकरेंनी करून दिलीये.
अक्षय कुमारला मोदींना आंबा कसा खायचा हे विचारण्यापेक्षा टरबूज कसा खायचा हे देखील विचारा कारण निवडणुकीनंतर टरबुजाची किंमत कमी होणार आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला. मी चपरासी झालो तरी चालेल मी पुन्हा येईन अशा पद्धतीचा वागणं देवेंद्र फडणवीस यांचं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमची सुरत लुटली होती त्याच महाराष्ट्राच्या दोन जणांना घेऊन तुमचा तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटतात बाळासाहेबांचे विचार नव्हे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
सुनील तटकरे छगन भुजबळांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळांच्या भेटीला गेले आहेत. छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दिलीप खैरे यांनी सुनील तटकरे यांचं स्वागत केलं.
उद्धव ठाकरे यांचा ताफा जात असताना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री यांची उपस्थिती आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. म्ही तर रक्ताचे होतात, घरातले होतात मग तुम्ही का बाळासाहेबांशी असे वागलात ? बाळासाहेब तर तुमच्याशिवाय जेवत नव्हते, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
Loksabha Election 2024 Live Updates: 4 जूननंतर ठाकरे आणि शरद पवार गटातले अनेक नेते इतर पक्षांमध्ये जाणार; भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा
डोंबिवलीत आज उद्धव ठाकरे यांची सभा होत असून भागशाळा मैदानात सायंकाळी ही सभा होणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी मशालीचे चिन्ह दाखवून केली घोषणाबाजी.
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आयोजित सटाणा येथील सभेत शरद पवारांचे भाषण सुरू असताना स्टेज मागील बॅनर वादळामुळे कोसळला त्यामुळे शरद पवारांना भाषण आटोपते घ्यावे लागले.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी मशालीचे चिन्ह दाखवून केली घोषणाबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शंभर खोके एकदम ओके अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाचं यावरील सुनावणी आता 15 जुलैला होणारेय. सुप्रीम कोर्टाच्या वेळापत्रकातून ही संभाव्य तारीख जाहीर करण्यात आलीय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं होतं. याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. यावर 15 जुलैला सुनावणी होणारेय.
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तीन दिवस दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता दारूची दुकाने आणि बार बंद होतील. 19 मे रोजी दिवसभर बंद असणार आणि 20 मे संध्याकाळी 5 वाजता ही उघडणार आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून हा आदेश काढला आहे.
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार प्रचारात दिसले नाहीत. नरेंद्र मोदींच्या नाशिकच्या सभेतही अजित पवार गैरहजर होते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाचे 4 आमदार असूनही फक्त छगन भुजबळांनीच मोदींच्या सभेला हजेरी लावली होती. मुंबईतील मोदींच्या रोडशो मध्येही अजित पवार कुठेच दिसले नाहीत. त्यामुळं आता ते नेमके आहेत तरी कुठे हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.
मोदींचा आत्मविश्वास गेला आहे. मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी मला गुजरातला घेऊन जायचे. गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. मोदींना मी इस्रायलला घेवून गेलो होतो. आता राजकारण करण्यासाठी माझ्यावर टीका करत आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी टीकेचा सूर आळवला. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जाती-धर्मात अंतर वाढवणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, असा घाणाघात शरद पवारांनी मोदींवर केलाय. देश एकसंघ ठेवण्याची पहिली जबाबदारी ही पंतप्रधानांची असते, असा चिमटाही त्यांनी दिंडोरीच्या सभेत काढला.
सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी विश्वजित कदमांना अप्रत्यक्षरीच्या इशारा दिलाय. माझं राजकीय आयुष्य बदलणारा माई का लाल अजून जन्माला आला नाही, अशा शब्दात संजयकाकांनी कदमांवर नाव न घेता घणाघात केलाय.
उद्धव ठाकरेंचा मुंबईत लोकसभा निवडणूक प्रचारांचा धुरळा उडणार आहे. उद्धव ठाकरे एकाच दिवशी मुंबईत चार सभा घेणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 18 मे रोजी उद्धव ठाकरे मुंबईत चार सभा घेणार आहेत.
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंचा जोरदार प्रचार सुरु आहे. आज त्यांच्या मतदारसंघात ते चार सभा घेणार आहे. मंगलप्रभात लोढा आज वसईत प्रचारासाठी जाणार आहेत, भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी त्यांची वसईत सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज तीन जाहीर सभा होणार आहे. दुपारी 2.30 वाजता पहिली जाहीर सभा ही मनमाडमध्ये होणार आहे. त्यांनतर संध्याकाळी कुर्ला नेहरुनगर आणि रात्री मुलूंडमध्ये मराठा मंडळाजवळ त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय.
श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला (रोड शो) सुरुवात होईल. आजदे गावात रॅलीचा समारोप होईल.
महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. रात्री 8 वाजता ठाण्यात उद्धव ठाकरेंची गडकरी रंगायतनमध्ये सभा होईल. तर नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली असणार आहे. रोड शो करत मुख्यमंत्री शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये केलंय. शिवसेना ठाकरे पक्ष जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल. कारण बाळासाहेबांना तेव्हा खुप दु:ख होईल, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. तर शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या पावट्यांना मोड फुटलेत असा पलटवार उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलाय.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.