Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. नवी मुंबईतील खारघरमध्ये भव्य सोहळा संपन्न झाला.  या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्रीसमर्थ मोठ्या संख्येने आले होते. 

Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान
LIVE Blog

Maharashtra Bhushan Award : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं, असं अमित शाहा यावेळी म्हणाले.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह अनेक मंत्री उपस्थित होते.  धर्माधिकारी म्हणजे आठवं आश्चर्य आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी अप्पासाहेबांचं कौतुक केलं.  तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखादरम्यान आप्पासाहेबांनी कशी मदत याबद्दल उपस्थितींना सांगितलं.  अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी श्रीसमर्थंकाचा जनसागर लोटला होता.   तर सन्मानमूर्ती यांनी असंख्य श्रीसमर्थकांसमोर ''आपल्या श्वास चालू असेपर्यंच हे काम असंच चालू ठेवणार'' निर्धार घेतला.  विशेष म्हणजे पुरस्कार रक्कम अप्पासाहेबांनी मुख्यमंत्री सहायता निधीला देगणी म्हणून दिली. 

16 April 2023
16 April 2023 11:16 AM

Maharashtra Bhushan Award live : नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्मानमूर्ती आणि ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी स्टेजवर विराजमान आहेत. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

16 April 2023 10:03 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी श्रीसदस्यांची अफाट गर्दी सोहळ्याच्या ठिकाणी दिसून येतं आहे. खारघर स्टेशनबाहेरही लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बघावं तिकडे श्रीसदस्य राज्याच्या कानाकोपऱ्यातून याची याची देही याची डोळा सोहळा पाहिला आले आहे. 

16 April 2023 07:55 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : या सोहळ्यात पार्किंगचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. अंदाजे या सोहळ्यासाठी 54 जवळपास बस आणि कारने येण्याची शक्यता आहे. 46 टक्के पब्लिक ट्रान्सपोर्टने येऊ शकतात. यावेळी सोहळ्याच्या ठिकाणनी 32 पार्किंग स्लॉट, 11 डेडीकेटेड रोड ठेवण्यात आले आहे. 20 हजार बस पार्किंगसाठी वेळी जागा ठेवण्यात आली आहे.  3 पार्किंग स्लॉट राखीव ठेवण्यात आले आहे. प्रत्येक स्लॉट मध्ये ट्रॅफिक वॉर्डन, ट्रॅफिक पोलिस अधिकारी, वैद्यकीय पथक उपस्थित असणार आहे.

 

16 April 2023 07:34 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : सोहळ्याच्या ठिकाणी श्री भक्तांसाठी 10 हजार टॉयलेट्स उभारण्यात आले आहेत. लोकांच्या वस्तू हरवल्या तर त्यासाठी लॉस्ट अँड फाऊंड अॅप तयार करण्यात आलंय. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पासेस वर क्यू आर कोड देण्यात आले आहेत, कोणाला कुठे बसायचे यासाठी आधीच नियोजन करण्यात आलं आहे.

16 April 2023 07:33 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update :
लोकांच्या मोबाईल रेंज नसेल त्यासाठी 13 विविध कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. पाण्याची व्यवस्था म्हणून सिडकोने पाईप लाईन टाकून 12 नळ मैदानात दिले आहेत. 500 छोटे फायर एक्सिंगविशर, 8 क्विक रिस्पॉन्स टीम तैनात आहेत. 70 अँब्युलन्स, त्यात 16 कार्डीयक आहेत, एक छोटे हॉस्पिटल देखील उभारण्यात आले आहे. 5 हॉस्पिटल आहेत त्यात प्रत्येक हॉस्पिटल मध्ये 100 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. 

16 April 2023 07:28 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : बेस्टकडून 500, ठाणे 350, नवी मुंबई 200 बसेस आल्या आहेत यांना विविध रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात येईल, 1350 स्टाफ ठेवण्यात आला आहे, मेकॅनिकल टीम ठेवण्यात आल्या आहेत. बेस्टकडून 500, ठाणे 350, नवी मुंबई 200 बसेस आल्या आहेत यांना विविध रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात येईल, 1350 स्टाफ ठेवण्यात आला आहे, मेकॅनिकल टीम ठेवण्यात आल्या आहेत. 

16 April 2023 07:25 AM

Appasaheb Dharmadhikari : श्रीमत दासबोधाच्या निरुपणातून समाज घडवण्याचं मोठं कार्य  पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी केलं आहे. त्यांचा वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची दखल संपूर्ण जगाने घेतली. याशिवाय अंधश्रद्धेवर प्रहार, व्यसनमुक्ती, लोकशिक्षण त्यातून त्यांनी कायम एक चांगला समाज बनवण्याचा ध्यास घेतला आहे. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव, वाड्या,शहर स्वच्छेचा विडा त्यांनी उचलला आहे. रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबीरतून त्यांनी समाजात मोलाचं काम केलं आहे. 

16 April 2023 07:04 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सन्मान सोहळ्यासाठी संपूर्ण कोकणातील लाखो श्री सदस्य मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकवासियांचं मनं जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 

16 April 2023 06:53 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द (Mumbai Local Mega Block)
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार असल्याने मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईला प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

16 April 2023 06:51 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने राज्य सरकारकडून शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य साजरा केला जाणार आहे.

 

16 April 2023 06:47 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : या सोहळ्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली आहे. तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त लोक या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे. सोहळ्याचा मुख्य स्टेजला किल्ल्याचं रुप दिलं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जबाबदारी कॅबिनेट मिनिस्टर उदय सामंत शंभूराज देसाई आणि रवींद्र चव्हाण यांचावर आहे. 

16 April 2023 06:46 AM

Navi Mumbai Maharashtra Bhushan Award Update : नवी मुंबईतील खारघरमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास हा सोहळा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित असणार आहे. 

Read More