Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement
LIVE NOW

Shiv Sena MLA Disqualification Result LIVE: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर

MLA Disqualification Hearing LIVE: राज्यातल्या सत्तानाट्याचा आज निवाडा. शिवसेना आमदार अपात्रतेचा आज निकाल. विधानसभा अध्यक्ष करणार फैसला. ऐतिहासिक निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष  

Shiv Sena MLA Disqualification Result LIVE: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर
LIVE Blog

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: राज्याच्या राजकारणात अखेर तो महत्त्वाचा दिवस उजाडला असून, या दिवशी नेमक्या कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं  ठरणार आहे. कारण राज्याच्या सत्तानाट्याचा निवाडा अखेर होणार आहे. 

राज्यात उलथापालथ घडवणाऱ्या सत्तासंघर्षावर बुधवारी फैसला होणार असून, शिवसेना आमदार अपात्रतेता निकाल आज लागणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार की ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार याचा फैसला अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्रता निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करणार आहेत. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष निकालाचे वाचन करतील. 500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेत ते निकाल वाचतील. निकालाची मुळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना नंतर दिली जाणार आहे. 

10 January 2024
10 January 2024 18:14 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना असून भरत गोगावलेंचा व्हिप योग्य, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. 

10 January 2024 18:10 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: शिंदेंचा गट हीच खरी शिवसेनाः राहुल नार्वेकर

10 January 2024 18:06 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: ठाकरे गटाचे अनेक युक्तीवाद फेटाळले; आत्तापर्यंतचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने

10 January 2024 18:02 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाहीः राहुल नार्वेकर

10 January 2024 17:59 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे लोकशाहीसाठी घातकः नार्वेकर

10 January 2024 17:50 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करता येणार नाही, पक्षप्रमुख ठाकरेंना शिंदेंना हटवण्याचा अधिकार नाहीः नार्वेकरांचे महत्त्वाचे निरीक्षण

10 January 2024 17:48 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: घटनेच्या १० व्या परिशिष्टात पक्षाचा नेता कोण याचा उल्लेख करण्यात आला आहे.  २७ ऑक्टोबर २०१८ च्या लीडरशिप स्ट्रक्चरनुसार निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं आहे.यानंतर पक्षात दोन परस्पर विरोधी गट निर्माण झाले आणि दोन्ही पक्षांनी खरा पक्ष असल्याचा दावा केला. घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार सभापतीला हे ठरवण्याचा अधिकार आहे.

10 January 2024 17:46 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: दोन्ही गटाचा शिवसेना पक्षावर दावा, पक्षाचा प्रमुख कोण एवढंच ठरवणारः राहुल नार्वेकर

10 January 2024 17:43 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: 2018ला पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळं 2018ची नेतृत्व रचना मान्य करता येणार नाहीः पक्षनेतृत्वाबाबत राहुल नार्वेकरांचे निरीक्षण

 

10 January 2024 17:32 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या, निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेची प्रत मान्यः राहुल नार्वेकर 

10 January 2024 17:30 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates:  १९९९ मध्ये शिवसेनेची घटना लिहिली होती. ती निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली. २०१८ ची पक्ष घटना निवडणूक आयोगाकडे नोंदवण्यात आली नाही. 

10 January 2024 17:27 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: २०१८ च्या शिवसेना पक्षाची घटना ग्राह्य धरली जाणार नाही. दोन्ही पक्षांना या पक्ष घटनेची माहिती आहे. यात निवडणूक आयोगाच्या निकालाचा सुद्धा आधार घेणार आहेः राहुल नार्वेकर

10 January 2024 17:25 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निवडणूक आयोग, पक्षाची घटना लक्षात घेऊन निकालः राहुल नार्वेकर

10 January 2024 17:24 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुखांवरुन मतमतांतरे. घटना, नेतृत्व आणि विधीमंडळ बहुमत हे घटक पक्ष ठरवताना महत्त्वाचे

10 January 2024 17:20 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: खरी शिवसेना कुणाची यावर वाचन सुरू; सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांवर निकाल वाचन

10 January 2024 17:16 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल प्रकरणाचं वाचन सुरू, पाच टप्प्यांत निकाल वाचन होणार

 

10 January 2024 17:14 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल वाचनास सुरुवात

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून ठळक मुद्द्यांचे वाचन सुरू

10 January 2024 16:41 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल वाचनास सुरुवात, विधानभवनातून राहुल नार्वेकर Live

10 January 2024 16:37 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates:  १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकालाच्या आधी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भेट दिली आणि यावेळी अभिषेक करत आरती देखील केली.

10 January 2024 16:32 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: ठाकरे गट आणि शिंदे गटाचे वकिल निकाल ऐकण्यासाठी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हजर. तर, ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, अंबादस दानवे, वैभव नाईक, सुनिल शिंदे तर शिंदे गटाचे राहूल शेवाळे, मंगेश कुडाळकर, भरत गोगावले,बालाजी किणीकर,संजय शिरसाठ उपस्थित

10 January 2024 16:22 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मेरिटप्रमाणे निकाल द्यावी ही अपेक्षाः मुख्यमंत्री शिंदे

निकाल  मेरिटवर आला पाहिजे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. बहुमत आमच्याकडे आहे. अधिकृत पक्षसुद्धा आमच्याकडे आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे अध्यक्षांकडून अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे त्यांनी हा निकाल द्यावाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

10 January 2024 16:18 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाचं काउंटडाऊन, दोन्ही गटाचे वकील विधानभवनात दाखल

10 January 2024 16:15 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाचं काउंटडाऊन, दोन्ही गटाचे वकील विधानभवनात दाखल

10 January 2024 16:10 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली आहे

10 January 2024 16:05 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. आमदार अपात्रता निकालाआधी राजकीय वर्तुळात चर्चा.

10 January 2024 15:46 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: तब्बल दीड तास चर्चा केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत मातोश्रीबाहेर. 

10 January 2024 15:05 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

आज चार वाजता सुनावणी आहे. अध्यक्ष महोदयांनी भेटीगाठी घेतली आहे. त्या पदाची शोभा कमी करुन टाकली आहे. त्या पदाला एक वेगळीच गरीमा आहे आणि वेगळीच उंची आहे. ते सांभाळण्याचं काम अध्यक्षांनी करायला हवं होतं, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. 

10 January 2024 14:52 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाची मंत्र्यंमध्येही उत्सुकता 

आमदार अपात्रता निकालासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून, निकाल काय लागणार, याविषयी मंत्र्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे. निकाल कुणाच्या बाजून लागू शकतो, निकालानंतरची राजकीय परिस्थिती, परिणाम याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. निकाल काहीही लागला तरी सरकारला धोका नसल्याने मंत्रीमंडळ मात्र बिनधास्त पाहायला मिळालं. 

10 January 2024 14:03 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मातोश्रीवर सुरक्षा वाढवली... 

आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान निकाल देणार आहेत. त्याच अनुषंगाने मातोश्रीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. निकाल कोणत्या बाजूने येईल आपल्या बाजूने आल्यास काय करायचे किंवा न आल्यास पुढची काय रणनीती असेल यासंदर्भात चर्चा करण्यासाठी संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळं मातोश्रीबाहेर आज इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

 

10 January 2024 13:19 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय देणारेत.निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली. निकालात कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच निर्णय असेल, तसंच निर्णय देताना कायद्याचं पालन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

10 January 2024 12:46 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार - पृथ्वीराज चव्हाण

आज आपण ज्या व्यक्तीला मत दिलं होतं ती व्यक्ती त्या पक्षात आहे का हेच मतदारांना ठाऊक नाही आणि हे राजकीय नेते किंवा पक्ष म्हणून आपल्याला सांगता आलं नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचं अपयश आहे. त्यामुळं हा कायदाच बदलला पाहिजे. या साऱ्याचे राजकीय परिणाम गंभीर असतील. कारण, 16 आमदारांना निलंबित करून त्यांचं मंत्रीपद गेलं आणि ते पुन्हा मंत्रीपदावर येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली तर हा मोठा राजकीय भूकंप असेल, असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. 

10 January 2024 12:41 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: धनुष्यबाण आणि शिवसेना आमचीच- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

न्यायालयानं शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्हं आमच्या गटाला दिल्यामुळं आम्हीच शिवसेना आहोत. आमच्याकडे आमदारांचा आकडाही जास्त आहे. परिणामी आमदार अपात्रताप्रकरणीचा निकाल मेरिटवर लागणार असून, आमचं सरकार घटनाबाह्य् नाही. सरकार पडेल, मुख्यमंत्री बदलेल असं म्हणणाऱ्यांना आता पराभव स्पष्टपणे दिसत असल्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असं मुख्यमंत्री एकनाश शिंदे स्पष्टपणे म्हणाले. ही मॅच फक्सिंग असती तर विधानसभा अध्यक्ष रात्रीच वर्षावर पोहोचले असते, ते तर दिवसाढवळ्या तिथं आहे, ते स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आले होते, असंही ते म्हणाले. 

10 January 2024 12:30 PM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मुख्यमंत्र्यांनी निकालापूर्वी आमदारांना दिले आदेश 

शिवसेना आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथे बोलवलं असून, सर्वांनाच दुपारी 3 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सायंकाली 4 वाजण्याच्या सुमारास हा निकाल जाहीर होताच हे सर्व आमदार विधानभवनावर जाणार आहेत. 

10 January 2024 11:10 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: 40 गद्दार बाद झालेच पाहिजेत 

'इथं दोनतीन बाजू पाहण्याजोग्या आहे, विधानसभेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे न्यायमूर्तींनी आरोपीची भेट घेण्याजोगं आहे. देशाच्या संविधानाच्या मार्गानं गेल्यास 40 गद्दार बाद झाल्याचाच निर्णय येणं अपेक्षित आहे. कोणत्याही पक्षासाठी नव्हे हा निर्णय देशासाठी महत्त्वाचा', असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधी गटावर घणाघात करत, विधानसभा अध्यक्षांनी संविधानाला अनुसरून निर्णय द्यावा असं आवाहन केलं. 

10 January 2024 11:07 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकाल दिल्लीतच लागलाय, आता फक्त...- संजय राऊत 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा उल्लेख करत आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निकाल देणार आहेत तो 'मॅच फिक्सिंग' असल्याचं म्हटलं आहे. "मॅच फिक्सिंग कसं असावं हे ठरवण्यासाठी भेटले. हे सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर असणार. नरेंद्र मोदी 12 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला. 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे. सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहितीये? हे घटनाबाह्य सरकार टीकवलं जाणार हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला निकाल माहिती आहे का? याचा अर्थ प्रधानामंत्र्यांनी निर्णय माहिती आहे. निर्णय दिल्लीत झाला आहे. त्यावर फक्त आता शिक्का मारणार आहेत," असं राऊत म्हणाले.

 

10 January 2024 11:04 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त 

बुधवारी महाराष्ट्राच्या राजकारणातला ऐतिहासिक निर्णय लागणार आहे. शिवसेना पक्षातील कोणता गट अपात्र ठरतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच या सुनावणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबईतील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

10 January 2024 10:59 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकाल आमच्याच बाजूने... 

'निकाल आमच्या बाजुने लागेल. कायद्याच्या कसोटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमच्या बाजुने निकाल देतील', असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी केलं आहे.

 

10 January 2024 10:41 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निकालाचं लाईव्ह स्ट्रीमिंग

विधीमंडळातील आमदार अपात्रता निकाल वाचनाचे लाईव्ह स्ट्रिमींग होणार आहे. ठाकरे विरूद्ध शिंदे गटाच्या अपात्र आमदार सुनावणीसाठीचं निकालवाचनाचं थेट प्रक्षेपण विधानभवन लिंकवरून करण्याची शक्यता आहे. पारदर्शकता आणि निकाल स्पष्टता असावी यासाठी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची ही भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. निकाल वाचन लाईव्ह लिंक माध्यम आणि जनतेला विधीमंडळ लिंक यावर दिली जाण्याची शक्यता आहे. 

10 January 2024 09:34 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: बेंचमार्क ठरणारा निर्णय 

अपात्र आमदार याचिका प्रकरणात सर्वांनाच न्याय मिळणार असून, निकाल देताना कायद्याचं पालन केलं जाईल. हा बेंचमार्क ठरणारा निर्णय असेल. या निर्णयामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. 

 

10 January 2024 09:31 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: विजय आमचाच...!

सत्तासंघर्षामध्ये विजय आमचाच होणार, कायद्याच्या बाजू समोर येऊन अध्यक्ष तसाच निर्णय देतील. निकालानंतर अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार, असा दावा आमदार अपात्रता निकालापूर्वी शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. 

 

10 January 2024 09:03 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: आमदार अपात्रता प्रकरणी कोणत्या गटातून कोणाकोणाची नावं पुढे? 

शिंदे गट- एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर 

ठाकरे गटाचे आमदार- अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनील राऊत, सुनील प्रभू, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, उदयसिंह राजपूत 

10 January 2024 08:11 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: आदित्य ठाकरेंनी बोलवली बैठक 

आदित्य ठाकरे यांनी बोलावली महाविकस आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक. हॉटेल सयाजी मध्ये नऊच्या दरम्यान ही बैठक सुरु होणार असून, या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा समावेश असणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी 'या' 2 आमदारांची आमदारकी कायम राहणार, कारण...

 

10 January 2024 08:07 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: एका भेटीमुळं बळावल्या अनेक शंका 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षावर जाऊन घेतलेल्या भेटीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जोरदार टीका केलीय. या भेटीमुळे शंकेला वाव आहे असा आरोप पवारांनी केलाय. तर न्यायाधीशच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार असा सवाल ठाकरेंनी केलाय. 

10 January 2024 07:55 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: महायुती सरकार नियमाने स्थापन झालं आहे- मुख्यमंत्री 

'महायुती सरकार नियमाने स्थापन झालं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही आमच्याकडे आहे. त्यामुळं मेरिटप्रमाणे आमदार अपात्रता निकाल लागावा' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. तर, योग्य कायदेशीर अपेक्षित निर्णयच अध्यक्ष घेतील असं म्हणताना आमची बाजू भक्कम असून असल्यानं अध्यक्ष आम्हाला न्याय देतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

10 January 2024 07:04 AM

Shiv Sena MLA Disqualification Hearing LIVE Updates: निर्णयातून दोन आमदार सुरक्षित

शिवसेना आमदार अपात्रता निकालामुळे सर्वांचीच धाकधूक वाढलीय.. मात्र या संपूर्ण घडामोडीत ठाकरे गटाचे दोन आमदार मात्र सुरक्षित आहेत. थोडक्यात ठाकरे गटाच्या दोन आमदारांवर अपात्रता निकालाचा कोणताही परिणाम होणार नाहीये. हे दोन आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके. शिंदे गटाने आमदार अपात्रता याचिका दाखल करताना आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्याने त्यांच्यावर अपात्रता कारवाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे आमदार ऋतुजा लटके या देखील आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून दूर असणार आहेत. मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके निवडून आल्या आहेत..

 

Read More