Raj Thackeray Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा, माहिम समुद्रात अनधिकृत दर्गा उभा केल्याचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी सभेत दाखवला.
Raj Thackeray Live Update : माहिम समुद्रात अनधिकृत दर्गा उभारल्याचा व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला. गेल्या दोन वर्षात तो दर्गा उभा करण्यात आला आहे. माहिम पोलीस स्टेशन बाहेर आहे, पण त्यांचं लक्ष नाही. महानगरपालिकेचं लक्ष नसतं. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यासमोर हा प्रकार सुरु आहे. हे लोकं नवं हाजीअली तयार करणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्, पालिका आयुक्तांना सांगतो महिनाभराच्या आत जर कारवाई झाली नाही तर तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर आम्ही उभं करु. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ देत. सवलती देत असाल, दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. एकदा राज्य माझ्याकडे आलं तर संपूर्ण राज्य सूतासारखं सरळ करुन ठेवेन.
Raj Thackeray Live Update : मशिदीवरचे भोंग बंद करा, गेल्या सरकारमध्ये 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या. एकतर मशिदीवरचे भोंगे बंद करा, किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही आमच्या पद्धतीने भोंगे बंद करतो. दोन पैकी एक निर्णय एकनाथ शिंदे सरकारला घ्यावाच लागेल.
Raj Thackeray Live Update : मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय, मला माणसं पाहिजे, मुस्लीम धर्मातीलही माणसं हवीत. मला जावेद अख्तरांसाराखा मुसलमान हवा. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनावलं.
Raj Thackeray Live Update : अलिबाबा आणि त्यांचे चाळीस जणं शिवसेनेतून बाहेर पडले, पण त्यांना चोर म्हणता येणार नाही, कारण ते चोर नाहीत, उद्धव ठाकरेंना कंटाळूनच ते बाहेर पडले, कोव्हिडच्या काळात हा मुख्यमंत्री कोणाला भेटायला तयार नव्हता. एक आमदार आपल्या मुलाबरोबर भेटायला गेले तर मुलाला बाहेर उभं केलं. कोणालाही भेटत नव्हते आता अचानक बाहेर पडायला लागलेत.
Raj Thackeray Live Update : नारायण राणे यांना शिवसेना पक्ष सोडायची इच्छा नव्हती. मी त्यांना फोन केला मी साहेबांशी बोलतो तुम्ही पक्ष सोडू नका, मी बाळासाहेबांना फोन लावला. त्यांना सांगितलं, राणेंना पक्ष सोडायचा नाहीए, बाळासाहेब बोलले त्यांना घेऊन ये घरी. मी फोन ठेवला आणि राणेंना फोन लावला आताच्या आता इथे या आपल्याला साहेबांकडे जायचं. ते तिथून निघाले, पण पाच मिनिटात मला बाळासाहेबांचा फोन आला, बाळासाहेबांनी मला सांगितलं राणेंना नको बोलवूस, बाळासाहेबांच्या मागे कोणीतरी बोलत होतं. काही लोकांकडून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु होतं,
Raj Thackeray Live Update : असं बोललं जात होतं की राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुखपद पाहिजे होतं, संपूर्ण पक्ष हातात पाहिजे होता, ते होऊ शकलं नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडले. माझ्या मनाला कधी शिवलं नाही. तो नुसता धनुष्यबाण नाही तर शिवधनुष्य आहे. मला माहित होतं की बाळासाहेब सोडून ते कोणालाही पेलवणार नाही. एकाला झेपलं नाही, दुसऱ्याला झेपेल की नाही माहित नाही
Raj Thackeray Live Update : गेल्या काही काळात राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय. माझा वाद विठ्ठलाशी नाही बडव्यांशी आहे. कष्ट घेऊन घामातून शिवसेना उभी राहिली. भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांना टोला
Raj Thackeray Live Update : अॅडगुरु, दिग्दर्शक, लेखक अशी ओळख असलेले भरत दाभोळकर यांनी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.
Raj Thackeray Live Update : राज ठाकरे मुख्यमंत्री झालेलं पाहिला आवडेल, शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य, राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याची प्रतिक्रिया, थोड्याच वेळात राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल होणार
Raj Thackeray Live Update : अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, शिवाजी पार्कात हजारो मनसैनिक दाखल. थोड्याच वेळात राज ठाकरे शिवाजी पार्कात पोहोचणरा, राज ठाकरे यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Raj Thackeray Live Update : मनसेच्या आजच्या सभेत मनसेच नव गाणं लॉन्च केले जाणार आहे... मनसे नेते प्रकाश महाजनही सभेसाठी उपस्थित आहेत. प्रकाश महाजनांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रसैनिक शिवाजी पार्कला पोहचतायेत. बाईक रॅली मनसे सैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.