Maharashtra Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन कैक दिवस उलटले. महायुतीला मताधिक्य मिळालं, असं असलं तरीही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, गृहखातं आणि इतर पालकमंत्रीपदं कोणाकडे जाणार. मंत्रिमंडळ वाटपामध्ये कोणत्या पक्षाला झुकतं माप दिलं जाणार याविषयीचे फक्त तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत.
नेतेमंडळींची वक्तव्य, चर्चा आणि बैठका यांच्यापलिकडे अद्यापही कोणतीच अधिकृत घोषणाही करण्यात आली नसल्यामुळं राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात बराच संभ्रम पाहायला मिळत आहे. एकिकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं मुख्य प्रकाशझोतापासून दूर राहिले असले तरीही मंत्रिमंडळात त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, याची बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
गृहमंत्रीपद आणि 13 मंत्रिपदाच्या मागणीवर शिंदेंचा शिवसेना पक्ष ठाम असल्याचं बोललं गेलं. सुरुवातील मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठीसुद्धा त्यांच्या नावाच्या चर्चांना वाव मिळाला. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका पोस्टनं सत्तास्थापनेता गुंता आणखी वाढवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याची एक प्रश्नार्थक पोस्ट त्यांनी केली आणि हा तिढा आणखी वाढल्याचं स्पष्ट झालं. दमानिया यांनी X पोस्टमध्ये लिहिलेल्या ओळी पाहता येत्या काही दिवसात महायुतीत नेमक्या कोणत्या राजकीय घाडमोडी घडणार आणि खरंच राज्यात राजकीय भूकंप येणार का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
'एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते. 4 दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है.'
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2024
परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद संगात होते.
४ दिवसांपूर्वी PC घेऊन भाजप ला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले,
दाल मे कूछ काला है.
ते पत्रकार मला म्हणाले की भाजप…
शिंदे विरोधी पक्षात ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2024
विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच का कट
सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच.
बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेतातच अस्तित्वात ठेवायचे नाहीत.
गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरं न वाटणे ही भाजप ची script
Eknath Shinde as Leader of…
माध्यम प्रतिनिधींचा हवाला देत ही भाजपचीच रणनीती असून, यामध्ये विरोधी पक्षच संपवण्याचा भजपचा कट असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. (भाजपला) त्यांना हवे नको ते सगळं पुरवलं जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण यांचाच... या शब्दात त्यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळं आता राज्याच्या राजकारणात पुढं नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.