Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

COVID 19 - राज्यात आज बाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांचं प्रमाण जास्त, रिकव्हरी रेटही वाढला

राज्याचा रिकव्हरी रेट वाढला! दिवसभरात १४ हजार ३४७ रूग्ण करोनामुक्त

COVID 19 - राज्यात आज बाधितांपेक्षा बरं होणाऱ्यांचं प्रमाण जास्त, रिकव्हरी रेटही वाढला

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत काल किंचित वाढ झाली होती. पण आज काहिसं दिलासादायक चित्र आहे. आज नवीन रुग्णांपेक्षा बरं होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. परिणामी राज्यातील रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यभरात 14 हजार 347 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, 9 हजार 798 नवीन करोनाबाधित आढळून आले असून, 198 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 56,99,983 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.73 टक्के इतका झाला आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,90,78,541 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,54,508 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,54,461 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,831 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत 758 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 758 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 18,764 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 734 दिवसांवर गेला आहे. 

Read More