Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Maharashtra Corona Update : राज्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये वाढ, पाहा किती रुग्ण सापडले

राज्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत  

Maharashtra Corona Update : राज्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये वाढ, पाहा किती रुग्ण सापडले

Maharashtra Corona Update : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. या आठवड्यात राज्यात हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. काल राज्यात 1 हजार 134 रुग्ण आढळले होते. आज त्यात आणखी वाढ झाली आहे. (Maharashtra Corona Update)

आज राज्यात कोरोनाचे 1357 नविन रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.87% इतका आहे. 

गेल्या चोवीस तासात राज्यात 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 98.5 टक्के इतकी झाली आहे. राज्यात आता 5888 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक 4294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात 769 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मुंबईत सर्वाधिक रुग्ण
राज्यात आज नोंद झालेल्या 1 हजार 357 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येने हजाराकडे वाटचाल सुरु केली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल 889 रुग्णांची नोंद झाली आहे. 

Read More