Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

विधानसभा निवडणूक २०१९ : मुंबईकरांनी कौल दिलेले उमेदवार

 महाराष्ट्र विधानसभा २०१९ चा निकाल स्पष्ट झाला आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ : मुंबईकरांनी कौल दिलेले उमेदवार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा २०१९ चा निकाल स्पष्ट झाला आहे. मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिल्याचे दिसून आले. महायुतीचे उमेदवार हे सुरुवातीपासूनच आघाडीवर पाहायला मिळाले. भाजपाने अबकी बार दोनशे पार आणि शिवसेनेने अबकी बार शंभर पार असा नारा दिला होता. पण मतदारांनी भाजपाला शंभर पर्यंत आणून सोडले तर शिवसेनेला साठीच्या घरापर्यंत नेले. त्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. काँग्रेसने ४५ तर राष्ट्रवादी ५८ जागांपर्यंत मजल मारली. आपल्याला कोणी गृहीत धरु नये हेच या निकालातून मतदारांनी दाखवून दिले. 

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

मुंबईत वरळीतील निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवली. यात त्यांना ८९ हजार २४८ मतं मिळाली. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे यांच्या रुपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी इथे प्रचारासाठी जोर लावला होता. मुंबईतील ३६ मतदारसंघातून या उमेदवारांना मुंबईकरांनी कौल दिला आहे. 

मतदारसंघ आणि विजयी उमेदवार 

बोरिवली येथून भाजपचे सुनील दत्ताराम राणे  विजयी

दहिसर येथून भाजपच्या मनिषा चौधरी विजयी

मागठाणे येथून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी

मुलुंड येथून भाजपचे मिहिर कोटेचा विजयी

विक्रोळी  येथून शिवसेनेचे सुनील राउत विजयी

भांडूप-पश्चिम येथून शिवसेनेचे रमेश कोरगावकर विजयी

जोगेश्वरी-पूर्व येथून शिवसेनेचे रविंद्र वायकर विजयी

कांदिवली-पूर्व येथून भाजपचे अतुल भातखळकर विजयी

चारकोप येथून भाजपचे योगेश सागर विजयी  

मालाड-पश्चिम येथून काँग्रेसचे असलम शेख विजयी

गोरेगाव येथून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी

वर्सोवा येथून भाजपचे डॉ. भारती लवेकर विजयी

दिंडोशी येथून शिवसेनेचे सुनील प्रभु विजयी 

अंधेरी पूर्व येथून शिवसेनेचे रमेश लटके विजयी

अंधेरी पश्चिम येथून भाजपाचे अमित साटम

विलेपार्ले येथून भाजपाचे पराग आळवणी विजयी 

चांदीवली येथून शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी

घाटकोपर पूर्व येथून भाजपाचे पराग शाह विजयी 

घाटकोपर पश्चिम येथून भाजपाचे राम कदम विजयी 

अणुशक्तीनगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक विजयी 

चेंबुर येथून शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर विजयी 

कुर्ला येथून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर विजयी

कलिना येथून शिवसेनचे संजय पोतनिस विजयी

वांद्रे पूर्व येथून झिशान बाबा सिद्दीकी विजयी

वांद्रे पश्चिम येथून भाजपाचे आशिष शेलार विजयी 

धारावी येथून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी 

सायन कोळीवाडा येथून भाजपाचे कॅप्टन तमिल सेल्वन विजय 

वडाळा मतदारसंघातून भाजपाचे कालिदास कोळंबकर विजयी 

माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी

वरळी येथून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी

शिवडी मतदार संघातून शिवसेनेचे अजय चौधरी यांचा विजय

भायखळा येथून शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी 

मलबार हिल येथून भाजपाचे मंगलप्रभात लोढा विजयी 

मुंबादेवी येथून काँग्रेसचे आमिन पटेल विजयी

कुलाबा येथून भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी 

Read More