Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मलबार हिल येथे मंत्र्यांसाठी नव्या १८ मजली इमारतीचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांसाठी नवी १८ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

मलबार हिल येथे मंत्र्यांसाठी नव्या १८ मजली इमारतीचा प्रस्ताव

दीपक भातुसे / मुंबई : राज्यातील मंत्र्यांसाठी नवी १८ मजली इमारत बांधण्याचा महाराष्ट्र सरकारच्या हाय पॉवर कमिटीचा प्रस्ताव पुढे आला आहे. मलबार हिलचा पुरातन शासकीय बंगला पाडून याठिकाणी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. मागील मागील चार महिन्यांपासून निर्णय प्रलंबित  होता. दरम्यान, विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का, असा भाजपने सवाल उपस्थित केला आहे.

मंत्र्यांच्या निवासासाठी नवी १८ मजली इमारत बांधण्याचा सरकारच्या हाय पॉवर कमिटीने निर्णय घेतला आहे. मंत्र्यांसाठी निवासस्थाने कमी पडत असल्याने १८ मंत्र्यांच्या निवासासाठी नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलबार हिल इथला पुरातन शासकीय बंगला पाडून त्या जागी ही इमारत बांधली जाणार आहे. 

या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एका मंत्र्याचे निवासस्थान असणार आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजपने टीका केलीय. सरकारचं डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. 

 मंत्र्यांच्या निवासासाठी नवी इमारत  

- हाय पॉवर कमिटीमध्ये मुख्य सचिवांसह चार सचिवांचा समावेश
- मंत्र्यांसाठी निवासस्थाने कमी पडत असल्याने १८ मंत्र्यांच्या निवासासाठी नवी इमारत बांधण्याचा निर्णय
- मलबार हिल येथील पुरातन या शासकीय बंगला पाडून त्या जागी बांधली जाणार इमारत
- मागील चार महिन्यांपासून निर्णय होता प्रलंबित

Read More