Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत

 कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका  संजय राऊत यांनी केली आहे.

आघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक

राष्ट्रादीचे नेते आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतलेले शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्यो दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी आहे. आघाडीचे सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे.

पहिल्या ट्विटनंतर राऊत यांनी काही मिनिटात दुसरे ट्विट करत विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे. कोरोनावर लस अजून सापडायची आहे. त्यामुळे कोरोना लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधखांना सापडायचा आहे. विरोधकांचे संशोधन जारी आहे. हे संशोधन सुरु असेपर्यंत विरोधकांनी आधी क्वारंटाईन व्हावे, असा खरमरीत सल्ला राऊत यांनी दिला आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. बुमरॅंक, असे म्हणत विरोधकांना थेट इशारा दिला आहे, तुम्ही काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी तो तुमच्यावरच पलटणार आहे.

Read More