Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आज मनसेचा १२वा वर्धापन दिन, राज ठाकरे करणार घोषणा

आज सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ वा वर्धापन दिवस साजरा होतोय.

आज मनसेचा १२वा वर्धापन दिन, राज ठाकरे करणार घोषणा

मुंबई : आज सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ वा वर्धापन दिवस साजरा होतोय.

मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात येणार आहे. १८ मार्चला होणा-या या मेळाव्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मनसेला मिळालेल्या आहेत. वर्धापन दिनाच्या सोहळ्यात याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे घोषणा करणार आहेत. 

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला २०१६ पासून सुरूवात करण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी चिरंजीव अमित यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा रद्द केला होता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला आता सुरूवात झालीय. 

Read More