Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एकनाथ शिंदे गटातून दुसरा आमदार परतला, सांगितलं मला बळजबरीने...

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात नवनविन घडामोडी घडत आहेत

एकनाथ शिंदे गटातून दुसरा आमदार परतला, सांगितलं मला बळजबरीने...

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातून आणखी एक आमदार निसटला आहे. काल आमदार कैलास पाटील यांनी शिंदे यांच्या गटातून पळ काढला होता. आज अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख ठाकरेंकडे परतले आहेत. 

मला हार्टअटॅक आला नव्हता, मला बळजबरीने इंजेक्शन देण्यात आल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. आमदार नितीन देशमुख यांनी गुजरात पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. 

मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक असल्याचं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. नितीन देशमुख हे आज नागपूरमध्ये परतले आहेत

आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसात दिली होती. यानंतर पोलिसांनी सुद्धा तत्परता दाखवत देशमुख यांचा शोध घेण्यासाठी एक पथक सुरतकडे रवाना केलं होतं. सोबतच आपल्या पतीची चिंता होत असल्याचं सांगत देशमुख यांच्या पत्नीही सुरतच्या दिशेने निघाल्या होत्या. 

Read More