Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

दागिने, शेअर्स, बीएमडब्ल्यू कार आणि... आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून उघड

Aditya Thackeray Property : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखला केला. यावेळी त्यानी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर  स्थावर मालमत्ता  6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे. 

दागिने, शेअर्स, बीएमडब्ल्यू कार आणि... आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रातून उघड

Aditya Thackeray Networth : राज्यभरात आज  महाविकास आघाडी आणि महायुतीसह अन्य उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यामध्ये जयंतराव पाटील यांनी इस्लामपूरमधून, मंत्री छगन भुजबळांनी येवल्यातून तर जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा रिंगणात उतरलेत. अर्ज भरण्यापूर्वी आदित्य ठाकरेंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुद्धा करण्यात आलं. राज्यातील परिवर्तनाची ही सुरुवात असल्याची  प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिलीये.

आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती?
निवडणूक आयोगात उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारी अर्जासोबतच उमेदवाराला प्रतित्रापत्र ही द्यावं लागत. प्रतिज्ञापत्रात उमेदवाराच्या नावावर किती संपत्ती आहे याची माहिती देणं बंधनकारक असतं. त्यानुसार आदित्य ठाकरे यांनी प्रतित्रापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यात त्यांनी चल संपत्ती 15 कोटींहून जास्त तर  स्थावर मालमत्ता  6 कोटी 4 लाख रुपयांची असल्याचं नमुद केलं आहे. 

आदित्य ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली संपत्तीची माहिती
- आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल. चार्जशीट दाखल झालेलं नाही. डिलाईल रोड खुला केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय
- आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड इथं काही एकर जागा. ज्याचं आताचं बाजार मूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहे
- आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर इथं दोन दुकानांचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजार मूल्य 4 कोटी 56 लाख रुपये इतकं आहे
- आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW कार आहे. 
-  1 कोटी 91  लाख 7  हजार 159  रुपयांचे दागिने आहेत
- जंगम मालमत्ता  - 15  कोटी 43 लाख 3  हजार 60
- स्थावर मालमत्ता - 6 कोटी 4 लाख 51 हजार 350 रुपये
- बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये
- बँक खात्यात फिक्स डिपॉजिट - 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपये
- शेअर मार्केट गुंतवणूक -  70 हजार 
- म्युच्युअल फंड - 10  कोटी 13 लाख 78  हजार 52 रुपये
- बॉण्ड्स - 50 हजार रुपये

एकूण गुंतवणूक (स्वतः) - 10 कोटी 14 लाख 98 हजार 52 रुपये
LIC पॉलिसी - 21 लाख 55 हजार 741 रुपये

Read More