Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

एसटी कामगारांची दिवाळी गोड होणार, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

शिंदे-फडणवीस सरकारचं राज्यातील एसटी कागमारांना दिवाळी गिफ्ट

एसटी कामगारांची दिवाळी गोड होणार, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Maharashtra ST Workers : राज्यातल्या एसटी कामगारांची दिवाळी (Diwali 2022) गोड होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळी भेट म्हणून एसटी कामगारांना बोनस (Bonus) मिळणार आहे. राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला 45 कोटी वर्ग करण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत. 

बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळी बोनस द्यावा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांच्यात वाढ करून तो 34 टक्क्यांपर्यंत करावा आणि दिवाळीपूर्वी थकबाकी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामार्फत करण्यात आली होती.

दरम्यान,  एसटी महामंडळाचे रखडलेले वेतन, विविध सवलत मूल्य आणि रखडलेल्या भत्त्यांसाठी राज्य सरकारने 300 कोटींच्या निधीला नव्याने मान्यता दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 2022-23 मध्ये सरकारने विविध सवलत मूल्यांपोटी 1388.50 कोटी शिल्लक तरतुदीमधून 300 कोटींना ही मान्यता दिली आहे.

वेतनाची तारीख जाऊन 5 दिवस उलटूनही वेतन मिळत नसल्याने एसटी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने  एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, बोनस, विविध देणी आणि भत्त्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी 300 कोटींच्या निधीला मान्यता दिल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.

Read More