Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा

संपूर्ण राज्याला एकीकृत बाजार क्षेत्रही घोषित करण्यात आले आहे

हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा

मुंबई: हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी केल्यास आता गुन्हा ठरणार आहे. यांसबधीचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतलाय. हमी भावापेक्षा शेतमाल कमी किमतीत खरेदी करणाऱ्याला १ वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद करण्याचा मंत्रीमंडळाने निर्णय घेतलाय.

कृषी उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतलाय.  संपूर्ण राज्याला एकीकृत बाजार क्षेत्रही घोषित करण्यात आले आहे त्याचप्रमाणे राज्यातील मोठ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याने याचा फायदा बळीराजाला होणार आहे.

नैसर्गिक आपत्ती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचे परिमाम, व्यापारी-दलाल यांची साठेबाजी आदी गोष्टींमुळे शेतकरी आगोदरच अडचणीत आहेत. त्यातच त्याचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत घेतल्यामुळे शेतकऱ्याची अधिकच कोंडी होत होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.

Read More