Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

महाविकास आघाडी अनैसर्गिक असल्याने टिकणार नव्हतीच; उदयनराजे भोसले यांची कडाडून टीका

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. 

महाविकास आघाडी अनैसर्गिक असल्याने टिकणार नव्हतीच; उदयनराजे भोसले यांची कडाडून टीका

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. 'महाविकास आघाडी स्थापनेपासून अनैसर्गिक आघाडी होती, स्थानिक कार्यकर्त्यांनाही ही आघाडी अडचणीची ठरत होती', असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

'महाविकास आघाडी सरकार हेच मुळात अनैसर्गिकरित्या तयार झालं होतं. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात जनतेने कौल दिला होता. अजुनही महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना हे सरकार कायम ठेवायचं असेल. तर,  त्यांनी त्यांच्या राजकीय करिअरमधले शेवटचे काही महिने किंवा वर्ष उपभोगून घ्यावेत.' अशी टीका उदयनराजे यांनी केली.

'खरे तर, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित काम करू शकत नाहीत. कार्यकर्ते लोकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांसाठी मतदान करायला कसे सांगणार. ही आघाडी स्थानिक कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अडचणीचीच आहे', असे उदयनराजे यांनी म्हटलं. 

नुकतेच जे शिवसेनेत बंड सुरू आहे. हे झालं कशामुळे आमदारांचं म्हणणं वेळीच विचारात घेतलं असतं तर, हे घडलंच नसतं. असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

Read More