Mumbai Accident News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर एक थरारक घटना घडली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर डोमेस्टिक एअरपोर्ट परिसरात कॅबच्या बोनेटवरून एका तरुणाला फरफटत नेले जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरपोर्ट पोलिसांनी कॅबचालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, एका प्रत्यक्षदर्शीने हा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली होती.
मुंबई विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलबाहेर आरोपी कॅबचालकाचे एका प्रवाशासोबत काही कारणावरून वाद झाला होता. चालकाने त्या व्यक्तीला धक्काबुक्की केली आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच, ड्रायव्हरला पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशाने त्याच्या कारच्या बोनेटवर उडी मारली. त्यावेळी कार थांबविण्याऐवजी कॅबचालकाने त्या व्यक्तीला त्याच अवस्थेत बोनेटवरून काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
#Mumbai | A man was seen clinging to the bonnet of a speeding #Ertiga car on the Western Express Highway in #VileParle. The driver, instead of stopping, kept accelerating, putting the man's life at grave risk. @MumbaiPolice @VileParle_PS @MTPHereToHelp pic.twitter.com/oa3RqehtJ3
— Mumbai Tez News (@mumbaitez) May 28, 2025
या घटनेचे चित्रीकरण एका प्रत्यक्षदर्शीने केले आणि या प्रकाराची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिली. संबंधित व्हिडिओ आणि ठिकाणाची माहिती पोलिसांना पाठविली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कॅबचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडीओमध्ये, संबंधित व्यक्त्ती कार वेगाने जात असताना तिच्या कडांना धरून असल्याचे दिसतेय. याप्रकरणी भीमप्रसाद महंतो या चालकाविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम ३५(३) आणि मोटार वाहन कायदा, कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पुण्यावरून लातूरकडे येत असलेल्या एका ट्रॅव्हल्सने दुसऱ्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली आहे. हा अपघात तुळजापूर - लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील आशीव पाटी येथे झाला आहे. अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोघांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातस्थळी पोलीस दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत 5 रुग्णवाहिका अपघात स्थळी दाखल झाल्या आहेत. रुग्णांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू आहे.