Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'मग बस कुठे आहे...' डेपो कर्मचाऱ्याचा चक्क मराठी अभिनेत्याला फोन; शिवशाहीच्या कार्यपद्धतीवर संतापला

मराठमोळ्या अभिनेत्याने शिवशाही बस आणि कार्यव्यवस्थेवर आलेला अनुभव व्यक्त करुन सरकारच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधलं आहे. 

'मग बस कुठे आहे...' डेपो कर्मचाऱ्याचा चक्क मराठी अभिनेत्याला फोन; शिवशाहीच्या कार्यपद्धतीवर संतापला

आजही गावोगावी किंवा खेड्यांना जोडणारा दुवा म्हणजे एसटी आणि शिवशाही. आजही अनेक लोक लालपरीने प्रवास करतात. यामध्ये मराठी कलाकारांचाही समावेश आहे. अनेक कलाकार आजही मुंबई-पुणे प्रवास किंवा कोकण प्रवास हा लालपरीने करतात. अशावेळी त्यांना आलेला अनुभव ते मांडतात. असाच एक अनुभव धर्मवीर सिनेमा फेम अभिनेता ऋतुराज फडके याने सोशल मीडियावर मांडला आहे.  ऋतुराजने सरकारच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधून घेतलं आहे. 

ऋतुराज दापोली-ठाणे असा शिवशाही प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान त्याला आलेला अनुभव पोस्टमध्ये मांडला आहे. बाहेर खूप जास्त ऊन होतं, गरम होत होतं, म्हणून शिवशाही बसचं रिझर्वेशन केलं. 70 km अंतर कापल्यानंतर शिवशाही गाडीचा एसी चालत नव्हता. AC मुळे कुलिंग होण्यापेक्षा त्यातून गरम वाफा येऊ लागल्या. हा सर्व प्रकार ऋतुराजने ड्रायव्हर आणि कंडक्टरला सांगितला. पण त्यांनी अभिनेत्याला उडवा उडवीची उत्तर दिली. 

यानंतर ही शिवशाही बस रखडतं पनवेल स्टँडला बंद पडली. सगळ्यांना ड्रयव्हरने खाली उतरायला सांगितलं. यानंतर अभिनेता कॅबेने घरी ठाण्याला गेला. ही बस अंदाजे अडीचच्या सुमारास ठाणे डेपोत पोहोचते. पण त्याच रात्री अभिनेत्याला ठाणे डेपोतून रात्री आठ वाजता फोन आला. आणि त्यांनी अभिनेत्याला बस कुठे आहे असा सवाल केला? म्हणजे बस तोपर्यंत डेपोत पोहोचली नव्हती. या संपूर्ण घटनेनंतर बस कुठे गेली? पनवेल डेपोत जाऊनही बस कुठे आहे याबाबत ठाणे डेपोला कल्पना का नव्हती? सरकारचा कारभार इतका भोंगळ का आहे? असा सवाल विचारले जात आहेत. 

अभिनेता ऋतुराज फडके याने धर्मवीर 2 सिनेमात नंदू शेडगेची भूमिका साकारली होती. तसेच मन उडु उडु झालं या मालिकेतही ऋतुराजची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडली होती. 

Read More