Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अटल बिहारी वाजपेयींचे मुंबईत उभारणार स्मारक - मुख्यमंत्री

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारण्याची घोषणा

अटल बिहारी वाजपेयींचे मुंबईत उभारणार स्मारक - मुख्यमंत्री

मुंबई : माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एनसीपीएमधल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी मान्यवरांनी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचं मुंबईत स्मारक उभारण्यात येणार आहे. वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबर्ईत आयोजित केलेल्या शोकसभेत मुख्य़मंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर आता अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक उभारण्यात येणार आहे, असे ते म्हणालेत.

Read More