Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Metro 3 ची कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात ? सरकार-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप

 मेट्रो कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात उभारण्यात आली तर त्याचा फटका बुलेट ट्रेनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला बसण्याची शक्यता

Metro 3 ची कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात ? सरकार-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप

मुंबई : कांजुरमार्गमधल्या मेट्रो कारशेडवर केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने  कामाला स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता मेट्रो 3 (Metro 3) ची कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात उभारता येईल का ?, याबाबतची चाचपणी सुरू झालीय. जर मेट्रो कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात उभारण्यात आली तर त्याचा फटका बुलेट ट्रेनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे महापालिकेच्या मालकीची जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेण्यात आलाय. आतापर्यंत चार वेळा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला. मात्र अद्याप  तो मंजूर होऊ शकलेला नाही. मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो.

ठाणे पालिका क्षेत्रातील शिळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे प्रस्तावा मंजुरी मिळते का?  त्यावर शिवसेना काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे.
 
कांजूर मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षाने हा राजकीय विषय केलाय. त्यात न्यायालयाने पडू नये अशी टीका शिवसेनेचे खासदार राऊतांनी केलीय. तर चूक आपण करायची आणि न्यायालयावर खापर फोडायचे अशी टीका फडणवीसांनी राऊतांवर केली. बोलताना संयम ठेवाण्याचं त्यांनी सल्ला दिला.  बीकेसीत कारशेड उभारणं खर्चीक असून कारशेडवरून नुसता पोरखेळ चालू असल्याची टीका त्यांनी केलीय. 

Read More