Mhada News Update: म्हाडाने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये नोकरी करणाऱ्या महिला आणि वृद्ध नागरिकांसाठी घर बांधण्याची योजना आखली आहे. त्यासाठी मुंबई, ठाणेसह राज्यातील विविध शहरांत हॉस्टेल आणि वृद्धाश्रम बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सर्व म्हाडाच्या सर्व विभागात वृद्धाश्रम आणि महिला हॉस्टेलसंबंधी प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
म्हाडाने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपुरमध्ये महिला वसतीगृह आणि वृद्धाश्रम बांधण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गंत मुंबईतील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल्स आणि वृद्धाश्रम बनवण्यात येणार आहे. मुंबईतील आराम नगर अंधेरीमध्ये वृद्धाश्रम बनवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ठाण्यात हॉस्टेल्स आणि वृद्धाश्रम तयार करण्यासाठी एक जागा फायनल केली आहे.
ठाण्यातील विवेकानंद नगर माजीवडामध्ये 100 बेडचे वृद्धाश्रम तयार करण्याची योजना आहे. हे आश्रम 1278 वर्ग मीटर क्षेत्रात होणार आहे. तर, विवेकानंद नगरमध्ये 1500 वर्ग मीटर क्षेत्रात 200 बेडचे महिला हॉस्टेलचा प्लान तयार करण्यात येणार आहे. म्हाडाच्या पुणे विभागात खराडी, कोल्हापुर जिल्ह्यात करवीरमध्ये महिला हॉस्टेल आणि सांगलीत मिराजमध्ये वृद्धाश्रम बांधण्यात येणार आहेत. नागपूर विभागाकडून दोन महिला हॉस्टेल आणि चंद्रपूरमध्ये एक वृद्धाश्रम बनवण्याची योजना बनवण्यात आली आहे. तर, नाशिक विभागाकडून महिला हॉस्टेल आणि वृद्धाश्रम बनवण्याची तयारी सुरू आहे.
म्हाडाने आत्तापर्यंत 9 लाखाहून अधिक घरे बांधली आहेत. घरं बांधण्यांव्यतिरिक्त म्हाडाने सोशल इंजिनिअरिंगच्या दिशेनेही पावलं उचलली आहेत. जेणेकरुन नोकरीसाठी महानगरात येणाऱ्या महिलांना सुरक्षितरित्या राहता यावे. तसंच, गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ नागरिकांबाबत घडणारे गुन्ह्यांतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळं सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन वृद्ध नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
मुंबईत भाड्याने घर घ्यायचं म्हणजे खूप रक्कम द्यावी लागते. या गोष्टी लक्षात ठेवूनच नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेलचे दरदेखील कमी ठेवण्यात येणार आहेत.
राज्यातील नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊनच सरकार नवीन हाउसिंग पॉलिसी तयार करत आहेत. उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन हाउसिंग पॉलिसीमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल आणि वृद्धांसाठी वृद्धाश्रमांना पॉलिसीत महत्त्वाचे स्थान देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिंदेंनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन पॉलिसीमध्ये वरिष्ठ नागरिक, मिल कामगार, पोलिस कर्मचारी, डब्बेवाले यांच्यासाठी घरांची व्यवस्था असणार आहे.