Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

म्हाडाचा अजब कारभार, महिलेला वितरीत केली मीटरची खोली

सायन प्रतिक्षानगरमधील दत्तकृपा हाऊसींग सोसायटीतील सर्व रहिवाशांना म्हाडाने दे धक्का दिला आहे.

म्हाडाचा अजब कारभार, महिलेला वितरीत केली मीटरची खोली

दीपाली जगताप-पाटील, मुंबई : सायन प्रतिक्षानगरमधील दत्तकृपा हाऊसींग सोसायटीतील सर्व रहिवाशांना सध्या धक्का बसला आहे. हा धक्का दिलाय तो म्हाडा प्राधिकरणाने. २००४ मध्ये म्हाडाने या इमारतीसाठी लॉटरी खुली केली. या अंतर्गत ३१ खोल्यांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, म्हाडाला १५ वर्षांनंतर जाग आली आहे. १५ वर्षांनंतर म्हाडाकडून अचानक खोलीचे वितरण करण्यात आले आहे.

मात्र, नुकतेच जून २०१९ मध्ये म्हाडाने सोसायट्यांच्या नावाने पत्र पाठवत या इमारतीतील ००१ खोली क्रमांक हा प्राजक्ता तीखे नावाच्या महिलेला वितरीत केल्याचे पत्र पाठवले. पण धक्कादायक म्हणजे ही खोली ही इमारतीची इलेक्ट्रीक मीटर तसेच कार्यालयाची खोली आहे. दरम्यान, सोसायटीला मीटर रुम आणि कार्यालय खाली करण्याचा आदेश म्हाडाने दिला आहे.

आता ही मीटर रुम बदलायची असून कार्यालयही खाली करा, असे पत्र म्हाडाने या महिलेला पाठविले आहे. दरम्यान तत्कालिन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी संबधित खोलीत विजेचे मीटर बसवल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी दिली. म्हाडा आता संबधित खोलीची दुरूस्ती करून ती खोली लाभार्थी महिलेच्या ताब्यात देणार आहे.

Read More