Mira Bhayandar CP Transfer : मीरारोडमध्ये काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याला मारहाणीच्या निषेधात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी 8 जुलैला मराठी भाषिकांकडून मोर्चाची हाक देण्यात आली होती. मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाली होती, त्यामुळे मराठी भाषिकांविरोधात व्यापारी असा तो मोर्चा होता. पण मंगळवारी मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीसह मराठी भाषिक संघटना मीरा रोडच्या रस्त्यावर उतरले होते. पण या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली होती. मराठी भाषिकांचा मोर्चाला परवानगी का नाही, व्यापाऱ्यांचा मोर्चा कसा झाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
पोलिसांनी मोर्चा नाकाराल्यामुळे मोर्चेकरी अधिक आक्रमक झाले होते. परवानगीला झुगारून त्यांनी मोर्चा काढला तर त्यांची धडपकड करण्यात आली. पावसाळी अधिवेशानात मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही माहिती सांगत तक्रार केली. राज्य सरकारने हा मोर्चाला परवानगी नाकारली नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मीरारोड पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती, असं सूत्रांनी सांगितलं आहे. तर सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का? असा प्रश्न उपस्थित होत चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत.
Mira-Bhayandar Police Commissioner Madhukar Pandey transferred. Niket Kaushik to be the Police Commissioner.
— ANI (@ANI) July 9, 2025
Last week, a shopkeeper was assaulted by Maharashtra Navnirman Sena (MNS) workers for not speaking Marathi here. pic.twitter.com/XhP8Xpupsc
तर आता निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. कौशिक हे अत्यंत शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचारविरोधी कारवायांसाठी ओळखले जातात. त्यांनी याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केलंय. प्रशासनातील कठोर निर्णयांसाठी ते प्रसिद्ध आहेत. मीरारोडमधील मराठी मोर्च्यानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण चिघळले असताना, नव्या आयुक्तांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.