Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर 'या' पक्षाला धक्का, आणखी एक आमदार शिवसेनेत

 आणखी एक आमदार शिवसेनेत

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर 'या' पक्षाला धक्का, आणखी एक आमदार शिवसेनेत

मुंबई : बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विलास तरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. विलास तरे यांनी शिवबंधन बांधलं आहे.

विलास तरे हे सलग दोन वेळा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या पक्षाकडून बोईसर विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. 

विलास तरेंच्या सेनाप्रवेशानंतर, भविष्यात आणखी कोण शिवसेनेत येणार हे लवकरच कळेल असं यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

fallbacks

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विलास तरे यांच्या, बहुजन विकास आघाडी पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे पक्षाच्या अडचणीत वाढ होणाची शक्यता आहे. 

विलास तरे यांच्याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपा, शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read More