Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'हिंदी पर्यायी भाषा असतानाही दादा भुसे शिक्षणमंत्री झाले', राज ठाकरेंनी लगावला टोला, 6 जुलैला मोर्चाची घोषणा

Raj Thackeray Press Conference: शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भेटीनंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली हिंदी सक्तीविरोधातील भूमिका कायम ठेवली आहे. तसंच 6 जुलैला गिरगाव ते आझाद मैदान मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.  

'हिंदी पर्यायी भाषा असतानाही दादा भुसे शिक्षणमंत्री झाले', राज ठाकरेंनी लगावला टोला, 6 जुलैला मोर्चाची घोषणा

Raj Thackeray Press Conference: शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भेटीनंतरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली हिंदी सक्तीविरोधातील भूमिका कायम ठेवली आहे. तसंच 6 जुलैला गिरगाव ते आझाद मैदान मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. काहीतरी मोठी गोष्ट लपवण्यासाठी हिंदीचा मुद्दा समोर आणला असावा अशी शंकाही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील आपली भूमिका कायम ठेवली असून, शिक्षणमंत्री दादा भुसे यासंदर्भातील माहिती देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र राज ठाकरेंनी आपल्याला हिंदीची सक्ती मान्य नसल्याचं दादा भुसेंना सांगितलं आहे. राज ठाकरेंनी काही सूचनाही केल्या असल्याचं दादा भुसे यांनी भेटीनंतर सांगितलं. दादा भुसे राज ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांना देणार आहेत.

राज ठाकरेंनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "दादा भुसेंनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. मी भूमिका फेटाळून लावली आणि मान्य नसल्याचं सांगितलं. त्यांनी अनेक दाखले दिले. पण भाषांचा पर्याय पाचवीपासूनच येतो. त्यांनी हेदेखील मान्य केलं की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशा प्रकारच्या गोष्टीचा समावेश नाही. ही जबाबदारी राज्यांवर टाकली असताना, त्यांना हे का करत आहेत किंवा का करायचं आहे हे अनाकलनीय आहे".

"मी त्यांना हेदेखील सांगितलं की, सीबीएसई किंवा नव्याने आलेल्या शाळा या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या. त्यांना देशभर फिरावं लागतं यामुळे शाळा सुरु केल्या होत्या. आता त्या शाळांचं वर्चस्व राज्यंच्या शाळांवर कऱण्याचा प्रयत्न आहे. हाच केंद्राचा आणि आयएएस अधिकाऱ्यांचा अजेंडा आहे," असा आरोप राज ठाकरेंनी केला. 

पुढे ते म्हणाले की, "इतर राज्यं असं काही करायचा प्रयत्न करत नसताना महाराष्ट्र हे का करत आहे अशी विचारणा केली. त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरं नव्हती. ते त्याच गोष्टी बोलत होते. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्ण विरोध असेल, आहे आणि राहणार. हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती होऊ देणार नाही". 

"मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरुन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मराठी माणसाचा मोर्चा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिकाशी बोलणार आहोत. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकाराला कळू दे. महाराष्ट्राने आपली संपूर्ण ताकद दाखवावी. सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघेल, विद्यार्थी, आणि पालकांना येता येईल यासाठी रविवार निवडला आहे. सर्व राजकीय पक्षांशी मी बोलणार आहे. महारष्ट्रातील प्रत्येकाने यात सहभागी व्हावं. महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा जो कट आहे त्याविरोधात सर्व मराठी लोकांनी मोर्चात सहभागी व्हावं अशी विनंती आहे", असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

"मोर्चात कोणताही झेंडा नाही त मराठी अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी बांधवांनी मोर्चात सहभागी होऊन, विरोध दर्शवावा. राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण सहभागी होतं आणि कोण येणार नाही हेदेखील मला पाहायचं आहे. महाराष्ट्र, मराठी माणसाच्या दृष्टीकोनातू ही महत्त्वाची लढाई आहे. यात संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं," असं आवाहन राज ठाकरेंनी कलं आहे. 

"उद्धव ठाकरे पण त्यात आलेत. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. मी आधीही सांगितलं होतं की, वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

रविवारी येणं सोपं जातं आणि सराकराला महाराष्ट्राची ताकद दिसायलाही सोपी जाते. शाळा बंद असतील, त्यामुळे विद्यार्थी पालकांना येणंही शक्य होतं असं ते म्हणाले. तसंच गिरगाव ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा जाईल असं सांगितलं. 

"अनेक लोक मीडियामधून मराठीवर बोलत असतात, पण मोक्याच्या क्षणी येत नाहीत. असे लोक पाहायचे आहेत, त्यात काही कलावंतही असतील. मी बोलण्यावर न बोलणारेही व्यक्त होतील," असं राज ठाकरे म्हणाले. सरकारला सुबुद्दी देवो यासाठी विठ्ठलाला साकडं घालेन असंही उपहासात्मकपणे सांगितलं. 

"भाषा सोडून कोणतीही गोष्ट आणण्याचा प्रयत्न करा, आमचा पाठिंबा असेल. त्या वयात सायकलिंग, स्विमिंग शिकू शकतात. भाषेचं बंधन का यामागे लॉजिक काय? तुम्ही स्विमिंग शिकवा, आता जी गोष्ट सांगत आहेत ती जीआरमध्ये आहे का? त्यात फक्त भाषा आहे," अशी टीका त्यांनी केली. 

"10 हजार शिक्षक भरती कऱणार सांगत आहेत. पगार द्यायला पैसे आहेत का?," असं ते शिक्षकांच्या तुटवड्यावर म्हणाले. महाराष्ट्रात इतके प्रश्न असताना, या सगळ्या गोष्टी सोडून भाषेवर का येत आहोत? कोणती तरी मोठी गोष्ट लपवण्यासाठी, दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु आहे का असा संशय यावा अशी स्थिती आहे असंही ते म्हणाले. 

"जेएनपीटीत भरती असून अदानी पोर्टला मुलाखती चालू आहेत. महाराष्ट्रात नेमकं काय चालू आहे? भाषेच्या सक्तीला सामूहिक विरोध करण्यासाठी मोर्चा आहे. राजकीय पक्षांशी बोणार आहे. हिंदी न शिकल्याने तुमचं काय वाकडं झालं? हिंदी शिकून लगेच बॉलिवूमध्ये काम मिळणार का? पाचवीनंतर हिंदी, संस्कृत पर्यायी भाषा होत्या. सगळे त्यातूनच डॉक्टर, इंजिनिअर झाले. महाराष्ट्र  आधीपासून मोठा आहे, तो याच शिश्रण पद्धतीतून मोठा आहे. मगा अचानक काय साक्षात्कार झाला? पाचवीनंतर हिंदी पर्याय असतानाही दादा भुसे झाले की शिक्षणमंत्री. दादा भुसेंना मूल्यांकनात  स्विमिंग येतं का विचारलं होतं का?," असा टोलाही त्यांनी लगावला. 

Read More