Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

संजय राव.. खुर्सी संभालो हवा तेज चलता है, मनसेचा टोला

'राऊत स्टाईल'मध्ये काय उत्तर मिळणार ? हे पाहणं महत्वाचं

संजय राव.. खुर्सी संभालो हवा तेज चलता है, मनसेचा टोला

मुंबई : संजय राव खुर्सी संभालो हवा तेज चलता है असे ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्यायत. हे ट्वीट कोणासाठी केलंय हे देशपांडे यांनी स्पष्ट केलं नसलं ट्वीटखाली युजर्स याचा संदर्भा सध्याच्या राजकीय घटनांशी जोडत आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधतं शिवसेना-भाजपच्या वादात उडी घेतल्याची चर्चा आहे.

राजकीय घडामोडींबद्दल भाष्य करताना अनेक नेते सिनेमातील गाणी किंवा डायलॉग्जचा आधार घेताना दिसतायत. यावरुनच राजकीय टोलेबाजी पाहायला मिळतेय. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कारवाईची दिशा स्पष्ट होत नसताना राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित होतोय. सुशांतच्या घरी झालेल्या कथित पार्टीत महत्वाचा नेता सहभागी असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली होती. पण अशाप्रकारच्या पार्टीचे कोणते पुरावे न दिसल्याचे मुंबई पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं.

या पार्श्वभुमीवर शिवसेने खासदार संजय राऊत यांनी काल सूचक ट्वीट केले होते. राज कुमार यांच्या डायलॉगची त्यांनी आठवण करुन दिली होती. 

"चिनाय सेठ..., जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते.."समझने वालोंको इशारा काफी है! असे ट्वीट राऊतांनी केले होते. संजय राऊतांनी या ट्वीटच्या माध्यमातून सरकार शंका उपस्थित करणाऱ्या भाजपवर निशाणा साधला होता. 

पण आता मनसेने याप्रकरणावरुन पुन्हा एकदा शिवसेनेला शिंगावर घेतल्याचे दिसते. आता याला 'राऊत स्टाईल'मध्ये काय उत्तर मिळणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Read More