Bhandup Employee Transferred: मुंबईत मराठीची गळचेपी झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. भांडुपच्या क्रोमा मॉलमध्ये टिळा पुसण्यास नकार दिल्यानं मराठी कर्मचाऱ्याची बदली केल्याचा आरोप करण्यात आलाय. कपाळावरचा टिळा पुसण्यास कर्मचाऱ्याने नकार दिला. यामुळे त्याची बदली रद्द करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर शोरुममध्ये जाऊन मनसेने राडा केलाय. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
भांडुप मधील क्रोमा स्टोअर मध्ये मनसे विद्यार्थी सेनेकडून राडा घालण्यात आलेला आहे. या क्रोमा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कपाळावर टिळा लावल्यामुळे स्टोअर मॅनेजर ने त्याला कपाळावरील टिळा पुसण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली गेली.
त्यानंतर या कर्मचाऱ्याने मनसे कार्यकर्त्यांना संपर्क केला. मनसेचे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते क्रोमा स्टोअर मध्ये घुसले. त्यांनी या ठिकाणी एकच गोंधळ घातला. कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करा अन्यथा मनसे स्टाईल दणका दिला जाईल असा इशारा दिला. यानंतर कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते या क्रोमा स्टोअर मधून बाहेर पडले.