Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत आज सेना-मनसैनिकांची गर्दी, घराबाहेर पडण्याआधी 'हे' वाचाच

Mumbai Traffic Advisory For Vijay Melava: आज मुंबईतील वरळी डोममध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येत आहेत.   

 मुंबईत आज सेना-मनसैनिकांची गर्दी, घराबाहेर पडण्याआधी 'हे' वाचाच

Mumbai Traffic Advisory For Vijay Melava: तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. आज वरळीतील डोममध्ये विजयी मेळावा होत आहे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागातून कार्यकर्ते या मेळाव्यासाठी हजर राहणार आहेत. त्यामुळं सहाजिकच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी एक ट्विट करत नागरिकांना अवाहन केलं आहे. 

वरळीतील एनएससीआय डोम येथे होणाऱ्या विजयोत्सव मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्याला ठाकरे बंधूंनी सगळ्या राजकीय पक्षांना आमंत्रित केले आहे. इतकंच नव्हे तर नाशिक, पुणे येथून कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. त्यामुळं सामान्य मुंबईकरांना वाहतुक कोंडीचा फटका बसू नये यासाठी पोलिसांनी वाहतूकी संदर्भात एक अवाहन केलं आहे. वाहतूक पोलिसांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये, शनिवार दिनांक 05/07/2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वा. दरम्यान वरळी डोम, एस. व्ही. पी. स्टेडियम, ( एन. एस. सी. आय. ) लाला लजपतराय मार्ग, वरळी, मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.प्रवाशांना त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

मराठी विजय मेळावा हा सकाळी 10 ते 2 या कालावधीत असणार आहे. त्यामुळं सकाळपासूनच कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळं प्रवाशांनी या कालावधीत प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असं अवाहन करण्यात आलं आहे. 

मुलुंड चेकनाक्यावरून अनेक वाहनं मुंबईच्या दिशेनं रवाना 

मुलुंड चेकनाक्यावरून ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं अनेक ठाकरे समर्थक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून 'चलो मुंबई'चा नारा देण्यात आला आहे. मुंबईतील ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला गर्दी होणार. 

नाशिकमधून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना 

नाशिकहून मनसेचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं निघणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. हा विजयी मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार असून महाराष्ट्रद्वेषींना ही चपराक असेल असा कार्यकर्त्यांचा सूर. हा मराठी माणसाचा विजय झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. 

Read More