Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

धक्कादायक ! मुंबईत खासदाराची आत्महत्या, सुसाईड नोटही सापडली

 मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदाराची आत्महत्या

धक्कादायक ! मुंबईत खासदाराची आत्महत्या, सुसाईड नोटही सापडली

मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदाराच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. दादरा-नगर हवेलीच्या खासदाराची मुंबईत आत्महत्या केली आहे. गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोटही याठिकाणी सापडली आहे. आत्महत्येचं कारण अजूनही समोर येऊ शकलेलं नाही. पण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांनी आत्महत्या का केली याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सुसाईट नोटमध्ये नेमकं कारण काय आहे. याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही.

Read More