Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अबब! ईशाच्या सोन्यासारख्या ड्रेसची किंमत सोन्याहूनही जास्त

किंमत ऐकून भुवया उंचावतील.

अबब! ईशाच्या सोन्यासारख्या ड्रेसची किंमत सोन्याहूनही जास्त

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिनंसुद्धा उद्योग- व्यवसाय क्षेत्रात आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. अतिशय कमी वयातच ईशानं यशशिखरं गाठली आहेत. अंबानी यांची हिच कन्या, ईशा तिच्या मिनमिळाऊ स्वभावासाठी आणि स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. अतिशय सुरेख असं तिचं स्टाईल स्टेटमेंट अनेकदा भल्याभल्यांना मात देऊन जातं. 

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून समोर आलेल्या ईशाच्या अशाच एका सोनेरी लकाकी असणाऱ्या ड्रेसनं सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. एका कार्यक्रमासाठी या ड्रेसच्या पेहरावासाठी ईशाच्या स्टायलिंगची जबाबदारी सेलिब्रिटी स्टायलिस्ट Ami Patel नं केली होती. 

संपूर्ण ड्रेसवर फ्लोरल प्रिंट होती. डार्क गोल्डन आणि ब्राऊन अशा रंगांच्या छटांचा वापर येथे करण्यात आला होता. ड्रेसचं कापड चमकदार असल्यामुळं ते अधिक उठावदार दिसत होतं. व्ही कट नेकलाईन आणि स्ट्रेट फॉल बॉटम असणाऱ्या या ड्रेसमध्ये ईशाचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. 

fallbacks

fallbacks

 

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या Monique Lhuillier या डिझायनरच्या स्प्रिंग कलेक्शनमधील या अतिशय लक्षवेधी ड्रेसची किंमत आता अनेकांनाच थक्क करुन जात आहे. डिझायनरच्या अधिकृत संकेतस्थळावरुन या ड्रेसच्या किंमतीबाबत माहिती मिळत आहे. जी खऱ्या अर्थानं एक तोळं सोन्याहूनही कैक पटींनी जास्त आहे. अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरणाऱ्या या ड्रेसची किंमत तब्बल ३२६,००० रुपये इतकी आहे. मुख्य म्हणजे अनेक अभिनेत्रींनाही ईशाचा हा लूक मागे टाकत आहे. 

 

Read More