Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईत तीन मजली घर कोसळले, 12 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले

 अँटॉप हिल (Antop Hill House Collapse) येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये तीन मजली घर कोसळून मोठी दुर्घटना घडली.  

मुंबईत तीन मजली घर कोसळले, 12 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले

मुंबई : A House Collapsed in Antop Hill : अँटॉप हिल (Antop Hill House Collapse) येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये तीन मजली घर कोसळून मोठी दुर्घटना घडली. सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत 12 जण मातीच्या ढिगाऱ्या खाली दबले गेले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Mumbai - A house collapsed in Antop Hill area. 12 persons rescued and shifted to a hospital)

fallbacks

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत 12 जणांची सुटका करण्यात आली आहे. किरकोळ जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे आसपासच्या रहिवाशांमध्येही घबराट पसरली आहे.  

Read More