Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मरीन ड्राइव्ह येथे थरारक अपघात; सिग्नल तोडून आलेल्या दुचाकीला कारची धडक, Video Viral

Mumbai Accident News: मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे एक अपघाताचा थरार समोर आला आहे. Viral Video पाहा 

मरीन ड्राइव्ह येथे थरारक अपघात; सिग्नल तोडून आलेल्या दुचाकीला कारची धडक, Video Viral

Mumbai Accident News: मुंबईत रविवारी मरीन ड्राईव्ह येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी कारचा अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारच्या डॅशकॅममुळं या अपघाताची थरारक दृष्ये समोर आले आहेत. तसंच, व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

व्हायरल व्हिडिओप्रमाणे, भरधाव येणाऱ्या दुचाकीला बाजूने येणाऱ्या कारची धडक बसली. त्यानंतर दुचाकीस्वार थोड्या अंतरावर जाऊन कोसळला. सुदैवाने दुचाकीस्वाराने हेल्मेट घातल्याने दुर्घटना टळली आहे. दुचाकीस्वाराने सिग्नल न पाळल्याने हा अपघात घडल्याचे बोललं जात आहे. तसंच, पाठीमागून येणारी कार सिग्नलवर थांबल्यामुळं हा संपूर्ण थरार डॅशकॅममध्ये चित्रीत झाला आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. 

दुचाकी भरधाव वेगात होती, तेवढ्यात रस्त्याच्या बाजूने येणाऱ्या ह्युंडाई क्रेटा कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी पुढे जाऊन या बॅरिकेडरला धडकली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला. मात्र, हेल्मेटमुळं मोठी दुर्घटना टळली आहे. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. 

पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. लगेचच तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यासह आणखी एक जण दुचाकीवर प्रवास करत होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दुचाकीस्वार बॅरिकेडला धडकल्यामुळं त्यांचा जीव बचावला असल्याचे नागरिकांनी सांगितला आहे. दरम्यान, तरुणांसोबत एक तरुणी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. 

Read More