Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

घरातून शाळेसाठी निघाली होती मुलगी, रस्त्यात डंपरने धडक दिली आणि जागेवरच...' गोरगावच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?

Mumbai Road Accident News: एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत चालली होती. तेव्हा मागून वेगाने येणाऱ्या एका डम्परने दुचाकीला ठोकर दिली. 

घरातून शाळेसाठी निघाली होती मुलगी, रस्त्यात डंपरने धडक दिली आणि जागेवरच...' गोरगावच्या रस्त्यावर नेमकं काय घडलं?

Mumbai Road Accident News: वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. वेगावर नियंत्रण न पाळल्याने इतरांच्या जीवाला धोका पोहोचतो, याची जाणिव वाहनचालकांना नसते. याची प्रचिती आज पुन्हा पाहायला मिळाली. मुंबईतल्या गोरेगावच्या रस्त्यावर विचित्र घटना पाहायला मिळाली. एका वेगवान डम्परने बाइकस्वाराला जोरदार ठोकर दिली. या घटनेत एका शालेय मुलीचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. ऑबेरॉय मॉलच्या जवळ ही घटना घडली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बाईकवरुन शाळेत चालली होती. तेव्हा मागून वेगाने येणाऱ्या एका डम्परने दुचाकीला ठोकर दिली. या घटनेत मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले.  घटनेत मृत्यूमुखी पावलेली मुलगी 13 वर्षांची होती. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read More