Mumbai-Ahmedabad Bullet Train: मोदी सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. घणसोली ते शिळफाटा दरम्यानचा 4.8 किमी मार्गापैकी 4 किमीचा मार्ग पूर्ण झाला असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील बोगद्याचे (अंदाजे 21 किमी) काम सुरू झाले आहे ज्यामध्ये 7 किमी अंतराचा समुद्राखालील मार्ग आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ही माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील घणसोली आणि शिळफाटा दरम्यानच्या 4.8 किमी पैकी 4 किमीचा मार्ग पूर्ण झाला आहे. एलिव्हेटेड व्हायाडक्ट्स, प्रमुख नदी पूल, स्थानक इमारती आणि बोगद्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. एकूण 393 किमी पियर बांधकाम, 311 किमी गर्डर लाँचिंग (सुपरस्ट्रक्चर) आणि 333 किमीचे गर्डर कास्टिंग पूर्ण झाले आहे. एकूण 127 किमी लांबीचे व्हायाडक्ट रेल्वेमार्ग कंत्राटदाराकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. रेल्वेमार्ग टाकणे आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएच ई) मास्ट उभारणे सुरू झाले आहे. गुजरातमधील एकमेव बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
गुजरातमधील वापी ते साबरमती दरम्यानच्या कॉरिडॉरचा भाग डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प (बीकेसी ते साबरमती विभाग) डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तथापि, बुलेट ट्रेन प्रकल्प हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प आहे. सिव्हिल स्ट्रक्चर्स, रेल्वेमार्ग, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन तसेच ट्रेनसेट्सच्या पुरवठ्याशी संबंधित सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी लागणारा नेमका कालावधी आणि खर्च निश्चित केला जाईल.
गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमधून आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार असून या मार्गावर मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी 12 स्थानके उभारण्याची योजना आहे.
मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचे किमीच्या वेगाने अवघ्या दोन तास सात मिनिटांत पार होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन सुरू होऊन वापी, सुरत,
वडोदरामागें अहमदाबादला पोहोचणार असल्याचे वैष्णव म्हणाले.
ANS: हा मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किमीचा वेगवान रेल्वे प्रकल्प आहे, जो दोन तासांत प्रवास पूर्ण करेल.
ANS: मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती ही 12 स्थानके असतील.
ANS: 4.8 किमीच्या मार्गापैकी 4 किमी पूर्ण झाले आहेत.