Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई विमानतळावरुन २२५ विमानांचे उड्डाण रद्द

 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य रनवे प्री मान्सून कामासाठी आज पुन्हा ११ ते ५ या वेळेत बंद  

मुंबई विमानतळावरुन २२५ विमानांचे उड्डाण रद्द

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य रनवे प्री मान्सून कामासाठी आज पुन्हा ११ ते ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी ११ ते ५ या काळात एकाही विमानानं उड्डाण घेतलं नाही आणि लँडिंगही केलं नाही. या दरम्यान २२५ विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं होतं. आजही परिस्थिती अशीच राहणार आहे. धावपट्टीवरील रबर काढण्याचं काम सुरू असल्यानं सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात आलीय. 

मुंबई विमानतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी धावपट्टी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तर अनेक उड्डाणांची वेळ बदलण्यात आलेय. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झालेय. दरम्यान, कामांदरम्यान गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून विमानसेवेच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

विमानतळावरील ०९/२७ आणि १४/३२ या दोन धावपट्ट्या काल सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. आज मंगळवारीही धावपट्टी बंद राहणार आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी विमान सेवा ११ ते ५ वेळेत बंद राहणार आहे.

Read More