Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पावसाचा कहर, ढिगाऱ्याखाली १५ कार दबल्या

 जवळपास १५ कार दबल्या गेल्या. 

पावसाचा कहर, ढिगाऱ्याखाली १५ कार दबल्या

मुंबई : मुंबईतील वडाळा भागातील अँटॉप हिल परिसरात लॉईड्स ईस्टेटच्या कम्पाऊंड लागून असलेला भाग कोसळला. त्यात जवळपास १५ कार दबल्या गेल्या. सुदैवाने यात कोणती जिवीतहानी झाली नाही. इथल्या रहिवाशांनी शेजारच्या कंस्ट्रक्शनबद्दल तक्रार केली होती पण यासंदर्भात करवाई झाली नव्हती.  शेजारी सुरू असलेल्या बांधकामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. 'दोस्ती एकर्स' ला बीएमसी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

धोक्याची घंटा 

या दुर्घटनेमुळे शेजारच्या इमारतींनाही यामुळे धोका निर्माण झालाय. या परिसरात अनेक टोलेजंग इमारती असल्याने हा देखील चिंतेचा विषय आहे. अशा प्रकारांवर कारवाई न झाल्यास मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची चिंता आहे.  पाऊस थोडा थांबला असला तरी पाणी साचण्याचं प्रमाण काही कमी होत नाही. दीड महिन्यापूर्वी तक्रार करुनही काही केलं नसल्याच स्थानिकांच म्हणणं आहे. 

Read More