Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

महापालिकेची जया बच्चन यांना नोटीस

बातमी आहे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासंदर्भातली

महापालिकेची जया बच्चन यांना नोटीस

मुंबई : बातमी आहे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासंदर्भातली

प्रतीक्षा बंगल्याची काही जागा रस्ता रुंदीकरणात जाणार आहे.  प्रतीक्षाच्या आतला दहा फूटांचा भाग रुंदीकरणात जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेनं प्रतीक्षा बंगल्याचे मालक अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि भाऊ अजिताभ बच्चन यांना नोटीस पाठवलीय..

बच्चन यांच्यासह अनेक जणांच्या बंगल्यांमधली आणि इमारतींमधली जागा रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह स्थानिकांनी या रुंदीकरणाला विरोध केल्याचं समजतंय. या रुंदीकरणाला बच्चन यांनी उघड विरोध केला नसला तरी आयुक्त, उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबतीत अमिताभ यांचं बोलणं झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी....

Read More