Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Breaking : मुंबईतल्या वांद्रे भागात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

अग्निशमन दल आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं बचावकार्य सुरु

Breaking : मुंबईतल्या वांद्रे भागात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतल्या वांद्रे इथल्या बेहराम पाडा भागात चार मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली आठ ते नऊ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाच जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आले असून जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहेत. 

अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिकेचे कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखीन काही जण असण्याची शक्यता आहे. छोटे गल्लीबोळे असल्याने मदतकार्यास अडथळे निर्माण होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे अनधिकृत बांधकाम होतं, एकावर एक चार मजले चढवण्यात आले होते. 

Read More