Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

CCTV फुटेज : पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे दोघींचा जीव वाचला

नेहमीच गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडल्याचं समोर येतंय

CCTV फुटेज : पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे दोघींचा जीव वाचला

मुंबई : धावत्या गर्दीत आपल्या थोड्याशा चुकीला बळी पडून रेल्वे अपघातात मृत्यूची संख्या प्रचंड आहे. अशा अपघातांत मृत्यूपासून एखादी व्यक्ती वाचली तरी ती आयुष्यभरासाठी जायबंदी होते. त्यामुळेच, असा एखादा प्रसंग डोळ्यांसमोर दिसला राहिला की अंगावर काटे उभे राहतात. असा नुकताच एक प्रसंग सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलाय. नेहमीच गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडल्याचं समोर येतंय. परंतु, या घटनेत एका पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे दोन महिलांचे जीव वाचलेत. त्यामुळे, या दक्ष पोलिसाचं सगळीकडूनच कौतुक होतंय.  

दादर स्थानकात चालत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना एका पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळालंय. सीसीटीव्हीमध्ये हे दृष्य चित्रित झालंय. लोकलमधून खाली पडल्यानंतर गणवेषात दिसणाऱ्या या पोलिसानं तत्काळ या महिलांना ओढून बाजूला घेतल्यानं त्यांचा जीव वाचला. सोमवारी रात्री दहा वाजता ही घटना घडलीय.

Read More