Mumbai Coastal Road Under Sea Tunnel Accident: कोस्टल रोडच्या बोगद्यात जोरदार पावसामुळे एक कार घसरून रस्त्याच्या मधोमध उलटल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता घडली. सुदैवाने गाडीच्या दोन्ही एअर बॅग्स उघडल्या गेल्यामुळे आणि चालकाने सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे गंभीर दुखापत टळली. मात्र, वाहन रस्त्यावर उलटल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
घटनेच्या वेळी मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाच्या टॅक्सी मदत पथकाचे वाहन अपघातस्थळाजवळून जात होते. त्यांनी कोस्टल रोडवरील आपत्कालीन लँडलाइन फोनचा वापर करून तत्काळ कंट्रोल रूमला संपर्क साधत अॅम्बुलन्स आणि टोइंग व्हॅन मागवली. मदत पथकातील सदस्यांनी त्वरीत परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत करत वाहनाभोवतीचा परिसर मोकळा केला. टोइंग व्हॅन आल्यावर, अपघातग्रस्त वाहन सरळ करण्यासाठी इतर वाहनचालकांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर वाहनाचे टोइंग करण्यात आले. या घटनेनंतर कोस्टल रोडच्या समुद्राखालील बोगद्यात उटल्या पडलेल्या कारचे व्हिडीओ समोर आले आहेत.
#Mumbai | Major #Accident on #CoastalRoad yesterday 7 pm, Car turns topsy turvy#RoadAccident #rashdriving #MumbaiRain #MumbaiTrainAccident #Maharashtra pic.twitter.com/bQELI8nc8i
— Mumbai Tez News (@mumbaitez) June 14, 2025
मरीन ड्राईव्ह ते बांद्रा वरळी सीलिंक या टप्प्यातला हा जवळपास 3 किमी लांबीचा हा समुद्राखालचा बोगदा आहे. हे खोदकाम करण्यासाठी 35 मजूर आणि भलंमोठं चिनी बनावटीचं टनेल बोअरिंग मशीन वापरण्यात आलं. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.
नक्की वाचा >> आजपासून सुरु होणारा 180 कोटींचा 'हा' ब्रीज ठरणार गेम चेंजर; वाचवणार मुंबईकरांच्या प्रवासाचा अर्धा तास
संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12 हजार 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा असून मे महिन्यामध्येच या मार्गाचं उद्घाटन झालं आहे. कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभागला गेला आहे.