Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Mumbai Crime : 7 तुकडे करुन डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यात भरले...; गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह

मुंबईतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यभरात जेथे निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे तेथे कांदिवली गोराई परिसरात खळबळजनक प्रकार घडला आहे. एका गोणीत मृतदेह सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Mumbai Crime : 7 तुकडे करुन डोकं, हात-पाय प्लॅस्टिकच्या डब्यात भरले...; गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, गोराईच्या बाबर पाडा येथे महाराष्ट्रात पर्यटन विकास विभागाच्या भागात हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाचे एकूण सात तुकडे करुन डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले आहे. पण अद्याप या मृतदेह कुणाचा आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. 

गोराईच्या बाबर पाडा येथील शेफाली गावाजवळ मृतदेहाचे तुकडे असलेली गोणी सापडली. ही गोणी झुडुपांमध्ये टाकण्यात आल्यामुळे मृतदेह कुजल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली. यावेळी नागरिकांनी शोध घेतल्यानंतर त्यांना ही गोणी सापडली. गोणीत मृतेदह असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. 

पोलिसांनी गोणी उघडताच त्यांना त्यामध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात विविध अवयव भरल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहे. 

चॉकलेटचं आमिष दाखवून केला बलात्कार 

ठाणे जिल्ह्यात सात वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशकुमार रामरक्षा जयस्वाल 20 वर्षांचा असून सात वर्षांच्या मुलीला चॉकलेट आणि आइस्क्रिम दाखवून तिला इमारतीच्या छतावर नेलं. तेथे 2 नोव्हेंबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. 

ही घटना घडल्यानंतर आरोपी रमेशकुमारने घटनास्थळावरून पळ काढला. पीडितेच्या पालकांच्या तक्रारीच्या आधारे, BNS चे कलम 64 (बलात्कार), 65 (2)  आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read More