Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अटकेनंतरही दाम्पत्याचा अघोरीपणा सुरूच, पोलिसांसमोरच मंत्र फुकले अन्...; भांडुप प्रकरणात हादरवणारा खुलासा


Bhandup Crime News:  अडीच वर्षांच्या चिमुकल्याला भुताटकी उत्तरवण्याच्या नावाखाली चटके देत मारहाण करणाऱ्या दाम्पत्याचा अघोरी प्रकार सुरूच

अटकेनंतरही दाम्पत्याचा अघोरीपणा सुरूच, पोलिसांसमोरच मंत्र फुकले अन्...; भांडुप प्रकरणात हादरवणारा खुलासा

Bhandup Crime News: अडीच वर्षाच्या चिमुकल्याला भुताटकी उतरवण्याच्या नावाखाली चटके देत मारहाण करणाऱ्या दाम्पत्यांकडून अद्यापही अघोरीपणा सुरूच असल्याचे समोर आले आहे. मारहाण करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केले आहे. मात्र पोलिस ठाण्यातही त्यांनी मंत्रोपचार सुरूच ठेवले आहेत. तसंच, हे दाम्पत्य अनाथ मुलांसाठी संस्था उघडण्याच्या तयारीत होते, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय. मात्र पोलिसांनी सापळा रचत या दाम्पत्याला अटक करून त्यांचा प्लान उघडकीस आणला आहे. 

भांडुपमधील जादूटोणा प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपी वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव हे दोघे गेल्या 14 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस चौकशी दरम्यान या दोन्ही आरोपींकडून मंत्रोपचार सुरू होते. तुरुंगात देखील या दोघांकडून मंत्रोपचार केले जात होते. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्यांच्या घरात सात जादूटोणा, भूत पिशाच घालविण्यासंदर्भातील पुस्तके तसेच नारळ आणि इतर जादूटोण्याचे साहित्य मिळाले आहे.

आरोपी दाम्पत्य त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या अडीच वर्षाच्या मुलाला भूतबाधा झाल्याचं सांगून या दोघांनी त्याला चटके दिले होते. या सोबतच त्याला वेताच्या छडीने मारहाण देखील केली होती. यानंतर मोलकरणीने दिलेल्या तक्रारीनंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे. या दोघांना लहान मुलांसाठी अनाथ आश्रम काढायचं होतं असं त्यांनी पोलीस चौकशी दरम्यान सांगितले. दरम्यान या दोघांसोबत आणखी कोणी या संपूर्ण प्रकरणात सामील आहे का याचा तपास करण्याचा प्रयत्न भांडुप पोलिसांकडून करण्यात येतोय.

दरम्यान, बुधवारी दुपारी हे प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी आरोपीचे घर गाठले असता घाराला कुलुप होते. तेव्हा पोलिसांनी लोकेशनच्या आधारे वैभव कोकरे हा घणसोली येथे लपला असल्याचे लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी राहत्या इमारतीत चौकशी सुरू करताच आरोपीची रिक्षा आणि दुचाकी तेथे पार्क असल्याचे समजले. त्यांनी तोच धागा पकडून कोकरेला कॉल केला. 'सोसायटीच्या तक्रारीनंतर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत वाहने जप्त केली आहेत. कागदपत्रे घेऊन तत्काळ येण्यास सांगताच कोकरे तेथे आला. पथकाने अवघ्या काही तासांतच दोघांना ताब्यात घेतले.

Read More