Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई हादरली! संपत्तीच्या वादातून भावाकडून बहिणीची हत्या; कुटुंबियांसमोरच किचनमधून...

Mumbai Crime News: भावा-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईमधील विलेपार्ले येथे घडली आहे.

मुंबई हादरली! संपत्तीच्या वादातून भावाकडून बहिणीची हत्या; कुटुंबियांसमोरच किचनमधून...

Crime News: मुंबईमध्ये संपत्तीच्या वादातून एका भावाने बहिणीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादादरम्यान 55 वर्षाच्या व्यक्तीने त्याच्या 57 वर्षीय बहिणीची हत्या केली. शिक्षिका असलेल्या 57 वर्षाच्या बहिणीवर भावाने चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. हा प्रकार विलेपार्ले येथे घडला असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये जुहू पोलिसांनी हल्लेखोर आरोपी भावाला अटक केली आहे. 

मयत आणि हल्लेखोराची ओळख पटली

मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीवरुन झालेल्या वादात भावाने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या माहिलेचं नाव अनवया पैगणकर असे आहे. अनवया या विलेपार्ले पश्चिमेकडील लल्लू भाई पार्क परिसरामध्ये वास्तव्यास होत्या. अनवया यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी भावाचं नाव आशिष करंदीकर असे आहे.

...म्हणून आईने बहिणीच्या नावावर केली सर्व संपत्ती

या भावा-बाहिणीमध्ये नेमकं घडलं काय याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष करंदीकर हा बेरोजगार आहे. आशिष करंदीकर घर सोडून मेघालयात वास्तव्यासाछी गेला होता. मात्र, 2 वर्षापूर्वी तो मुंबईत परतला आणि त्याच्या कुटुंबासह राहू लागला. दरम्यानच्या काळात, आशिष मेघालयामध्ये राहण्यासाठी गेला होता त्यावेळेस त्याच्या आईने मालमत्ता सर्व मालमत्ता अनवयाच्या नावावर केली होती. 

स्वयंपाक घरातून चाकू घेतला अन्...

आईने सर्व संपत्ती बहिणीच्या नावावर केल्याने भावंडांमध्ये मालमत्तेवरून सतत वाद होत होते. आशिष करंदीकरने शुक्रवारी सकाळी स्वयंपाक घरातून चाकू घेतला आणि कुटुंबीयांसमोर अनवयावर तीन वेळा वार केले. अनवयावर तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

13 वर्षांपूर्वीच सोडून गेली पत्नी

आशिष करंदीकरची पत्नी त्याला 13 वर्षापूर्वीच सोडून गेली असून, त्याला दोन मुले आहेत. जुहू पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून घडलेल्या प्रकारामुळे पैगणकर आणि करंदीकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Read More