Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबई हादरली! विमानाच्या महिला पायलटवर धावत्या कॅबमध्ये लैंगिक अत्याचार

विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. चालकासह दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  मुंबई हादरली! विमानाच्या महिला पायलटवर धावत्या कॅबमध्ये लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News: विमानाच्या महिला पायलटवर धावत्या कॅबमध्ये लैंगिक अत्याचार झाला आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिन आरोंपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे कॅने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरेत्रबाबात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
प एका नामांकित एअरलाइन्समधील पायलट तरुणीने याबबात तक्रार दाखल केली आहे.

प्रवासादरम्यान वाटेत बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने दमदाटी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तरुणीच्या आरोपावरून घाटकोपर पोलिसांनी चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. प्रवासादरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. या फुटेजच्या आधारे नेमका काय घडलं याला उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

तक्रारदार महिला ही घाटकोपरमध्ये राहते. महिला तक्रारदार या नामांकित एअरलाइन्समध्ये पायलट आहेत. तर, त्यांचे पती इंडियन नेव्हीमध्ये नोकरीला आहे. 19 जूनला पतीला भेटून त्या रात्री 10.45 च्या सुमारास फोर्ट येथून कॅबने घाटकोपरच्या दिशेने येत होत्या. 25 मिनिटांच्या प्रवासानंतर चालकाने मार्ग बदलून दुसरीकडे गाडी थांबवून दोन अनोळखी व्यक्तींना गाडीत बसवले. त्यातील एक जण समोरच्या सीटवर बसला आणि दुसरा बाजूला पाठीमागे येऊन बसला. दोघांचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे होते. बाजूला बसलेल्या व्यक्तीने अचानक उजवा हात पकडून पिरगळला. त्यामुळे आरडाओरड करत असताना समोर बसलेल्या व्यक्तीने दमदाटी करत अश्लील स्पर्श केला. हा सर्व प्रकार सुरू असताना चालक मात्र शांतपणे टॅक्सी चालवत होता.

थोड्याच वेळात पुढे एका ठिकाणी पोलिस नाकाबंदी चालू असल्याचे दिसताच, चालकाने गाडीचा वेग कमी केला. दोघे जण तेथून पसार झाले. मुंबईत नवीन असल्याने हा प्रकार घडला त्या ठिकाणाची माहिती नाही. रात्र असल्याने आणखी विचित्र घटना घडू नये, म्हणून प्रथम घर गाठण्याचा निर्णय घेतला. घराजवळ जाऊन चालकाला त्या दोन तरुणांबाबत विचारणा केली, तेव्हा तो निरुत्तर होता. भाड्याचे पैसे घेऊन तोही घाईघाईत निघून गेला, असा दावा तक्रारदार महिलेने केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तपास सुरू केला आहे. तिच्या जबाबात बऱ्याच विसंगती असल्याचेही दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Read More